Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रNew Govt : ...तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लागली असती, संजय राऊत असे...

New Govt : …तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लागली असती, संजय राऊत असे का म्हणाले?

Subscribe

14व्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपलेली आहे. आमच्याकडे बहुमत असते तर, सरकार स्थापन केले नाही म्हणून एव्हाना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असती आणि आम्हाला सत्तेपासून दूर ठेवले असते, असे सांगत संजय राऊत यांनी राज्यपालांवर शरसंधान केले आहे.

(New Govt) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर 2024) जाहीर झाला. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, तरीही अद्याप राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यावर निशाणा साधला. (Sanjay Raut targets Governor Radhakrishnan)

विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल 230 जागा जिंकल्या. त्यानंतर शिवसेना आणि भाजपा या दोघांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने पेच निर्माण झाला होता. शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली आणि तिने नेत्रदीपक यश मिळवल्याने मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेने दावा केला होता, असे सांगण्यात आले. मात्र, काल, बुधवारी दुपारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या पदावरील दावा सोडल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपाकडेच हे पद राहणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे जवळपास निश्चित झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Cabinet : मंत्रिपदांबाबत अजित पवार यांची स्पष्ट भूमिका, भाजपाकडे केली ही मागणी

यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी आज, गुरुवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यावरून महायुतीवर टीका केली. 200पेक्षा जास्त जागा जिंकण्याऱ्या महायुतीला मुख्यमंत्री ठरवता येत नाही. भाजपाकडे जवळपास पूर्ण बहुमत तरीही मुख्यमंत्रिपद का लटकून पडले आहे? महाराष्ट्राला कोण मुख्यमंत्री मिळेल, केव्हा मिळेल याची आम्ही सर्वच वाट पाहात असल्याची खोचक टीका त्यांनी केली.

- Advertisement -

महायुतीकडे पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाही, असे सांगत त्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्यावर शरसंधान केले. 14व्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपलेली आहे. आमच्याकडे बहुमत असते तर, सरकार स्थापन केले नाही म्हणून एव्हाना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असती आणि आम्हाला सत्तेपासून दूर ठेवले असते. कारण नियम आणि कायदे फक्त आमच्यासाठी म्हणजे विरोधी पक्षांसाठी आहेत. महायुतीसाठी ते नाहीत, अशी टीका त्यांनी केली. (New Govt: Sanjay Raut targets Governor Radhakrishnan)

हेही वाचा – Politics : मोदी सरकारचा संविधान दिवस धक्कादायक नाही; ठाकरे गटाची बोचरी टीका


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -