घरताज्या घडामोडीमुंबईच्या सीमेपर्यंत येणारा हाय-वे आता जेएनपीटीपर्यंत; नितीन गडकरींची घोषणा

मुंबईच्या सीमेपर्यंत येणारा हाय-वे आता जेएनपीटीपर्यंत; नितीन गडकरींची घोषणा

Subscribe

गडकरी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली.

मुंबईच्या सीमेपर्यंत येणारा हाय-वे आता जेएनपीटीपर्यंत नेणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली. दिल्ली-मुंबई महामार्गाचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. हा महामार्ग जेएनपीटीपर्यंत घेऊन जाणार असून यासाठी महाराष्ट्र सरकारची मदत घेण्यात येणार असल्याचीही माहिती गडकरी यांनी दिली. गडकरी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे हेसुद्धा उपस्थित होते.

मुंबईच्या सीमेपर्यंत येणारा हाय-वे आता जेईनपीटीपर्यंत नेणार असल्याची घोषणा गडकरींनी पत्रकार परिषद घेत केली. जेएनपीटी महामार्गसाठी लागणाऱ्या स्टील आणि सिमेंटचा जीएसटी खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही यावेळी गडकरी यांनी सांगितले. मुंबई-दिल्ली हाय-वेच्या महाराष्ट्रातील पॅकेजसच्या जमीन अधिग्रहणाचे काम सुरु आहे. तसेच नागपूर-हैदराबाद एक्स्प्रेस-वे बांधणार आहे. मुंबई-गोवा हाय-वे प्रोजेक्टबद्दल स्टेट बँक अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. एका वर्षाच्या आत मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले. उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणारे ट्रॅफिक मुंबई-पुणे-हैदराबाद येथून जात होते. आता आम्ही सुरत-नाशिक-सोलापूर असा नवीन ग्रीन हाय-वे उभारणार आहोत. या ग्रीन हाय-वेमुळे मुंबई आणि पुण्याची वाहतूक कमी होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग या तीन पॅकेजवर काम सुरु झाले आहे, अशी माहितीही गडकरी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. पालखी मार्गावर सुंदर रचना असेल. जनतेच्या प्रतिक्रिया मागवण्यात येतील. पालखी मार्ग आणि पुण्यातील चांदणी चौकाबाबत चर्चा करणार आहे. ९० टक्के जमीन अधिग्रहीत झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल. १२ हजार कोटींचा खर्च पालखी मार्गासाठी करण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -