नवीन कात्रज बोगदा काही दिवस बंद, मुंबईत येण्यासाठी ‘हा’ पर्यायी मार्ग खुला

new katraj tunnel

पुणे – साताऱ्यामार्गे मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक काही दिवसांकरता बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे. १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत आणि २३मार्च रोजी रात्री ११ वाजल्यापासून २४ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

नवीन कात्रज बोगदा बंद ठेवण्यात येणार असल्याने साताऱ्याहून मुंबईत येण्यासाठी प्रवासी जुना कात्रज बोगदा मार्ग, कात्रज चौक, नवले पूल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरून मुंबईच्या मार्गावर येऊ शकणार आहेत.

मार्ग बंद का

व्हीएमएस आणि व्हिएसडी सिस्टिम बसवण्याचे काम सुरू असल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, कात्रज बोगद्याची साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.

हेही लक्षात ठेवा

साताऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली असली तरीही मुंबईहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू असणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून कळवण्यात आले आहे.