घरमहाराष्ट्रमनसेचा नवा झेंडा वादात

मनसेचा नवा झेंडा वादात

Subscribe

निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बहुचर्चित नवीन झेंडा आता नव्या वादात अडकला आहे. नव्या झेंड्यात शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर केल्यामुळे निवडणुक आयोगाने नोटीस बजाविली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या नोटीसला आता मनसे काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही संघटनांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ही नोटीस बजाविण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बदललेल्या झेंड्याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी जय हो फाऊंडेशन, संभाजी बिग्रेड आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नोटीस पाठविली आहे. निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी ही नोटीस बजाविली आहे. 5 फेब्रुवारी रोजी ही नोटीस बजाविली आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अंतर्भाव राजकीय पक्षासाठी थोर व्यक्ती व चिन्हांचा गैरवापर करण्यात आल्याचे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

हा विषय निवडणूक आयोगाच्या कक्षेत नाही
या नोटीसीसंदर्भात बोलताना मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने पाठविलेली नोटीस आम्हाला मिळालेली नाही. त्यांना आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठविलेल्या पत्राची प्रत पाठविणार आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याचा विषय निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नाही. जर त्यांच्या अख्तारीत हा विषय येत नसेल तर तो राज्य निवडणूक आयोगाच्या कक्षेत येणार नाही. देशाच्या झेंड्याबाबत जे नियम आहेत, त्यांचे सर्वांना पालन करावे लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -