सिडको : नवीन नाशिक सकल मराठा समाज शिवजन्मोत्सव २०२५ समितीची बैठक निकतीच संपन्न झाली. या बैठकीत नविन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्षस्थानी अक्षय पाटील आणि महिला अध्यक्ष पदी माधवी पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. (New Nashik Maratha Samaj Executive Committee announced; Akshay Patil as President, Madhavi Patil as Women President)
नवीन नाशिक सकल मराठा समाज २०२५ शिवजन्मोत्सव सोहळा बैठक नुकतीच सरस्वती गुलबराव पाटील नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी बैठकीचे अध्यक्ष मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णा पाटील यांना देण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते मामा ठाकरे, माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, माजी नगरसेवक श्याम कुमार साबळे, रवी पाटील, दादा कापडणीस, विश्राम बापू सोनवणे, यशवंत नेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आशिष हिरे, विजय पाटील, उमेश चव्हाण, डॉ वैभव महाले, हर्षल चव्हाण, सागर पाटिल, प्रितम भामरे, पंकज पाटील, अमित खांडे, प्रा.समाधान ठोके, मुकेश शेवाळे, पवन मटाले, सागर पाटील आदी उपस्थित होते. योगेश गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब गिते यांनी आभार मानले.
अशी आहे कार्यकारणी
अध्यक्ष – अक्षय पाटील, महिला अध्यक्ष माधवी पाटील, महिला कार्य अध्यक्षपदी जयश्री हिरे, पुरुष कार्याध्यक्ष प्रशांत आहिरे, खजिनदार योगेश गांगुर्डे, प्रसिध्दी प्रमुख जय पवार, सल्लागार ज्ञानेश्वर गायधनी, प्रवक्ता पदी प्रा. अमोल पाटील, उपाअध्यक्ष पदी भूषण भामरे, रविराज पाटील, योगेश पाटील, उमेश धामणे, बंटी पवार, हर्षद पाटील, केतन चव्हाण, सरचिटणीस शुभम महाले, योगेश आहिरे, हरीश शेवाळे, प्रसाद आंबेकर, चिटणीस धनंजय देशमुख, निखिल आडे, संघटक जितेंद्र पाटील, दर्शन चव्हाण, देवा हिरे, अमोल खैरनार, सचिव करण आरोटे, किशोर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.