घरताज्या घडामोडीहेल्मेट घातले असतानाही कापले जाणार 2000 रुपयांचे चलान; जाणून घ्या नवा वाहतुकीचा...

हेल्मेट घातले असतानाही कापले जाणार 2000 रुपयांचे चलान; जाणून घ्या नवा वाहतुकीचा नियम

Subscribe

चारचाकी आसो वा दुचाकी, कोणतेही वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. विशेषत: दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक असते. याबाबत वारंवार सुचनाही वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात. मात्र तरिही अनेकजण विनाहेल्मेट गाडी चालवतात. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.

चारचाकी असो वा दुचाकी, कोणतेही वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. विशेषत: दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक असते. याबाबत वारंवार सुचनाही वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात. मात्र तरिही अनेकजण विनाहेल्मेट दुचाकी चालवतात. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, आता हेल्मेट घातले असले, तरी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ऐकून नवल वाटलं असेल, पण होय हे खरंय, यापुढे दुचाकी चालवताना हेल्मेट घातलेय आणि त्याची स्ट्रिप लावली नसेल तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार, दुचाकी चालवताना हेल्मेट घातले आहे, पण हेल्मेटची स्ट्रिप लावली नसेल, तर 1000 रुपयांचे चलान कापल जाऊ शकते. तसेच, आपण सदोष हेल्मेट म्हणजेच BIS नसलेले हेल्मेट घातले असल्यास 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. नियम 194D MVA नुसार ही दंडात्मक कारावई केली जाणार आहे. त्यानुसार एकूण 2000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. त्यामुळे आता दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारच असेल, शिवाय हेल्मेटची स्ट्रिप लावणेही आवश्यक असणार आहे.

- Advertisement -

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, आपले वाहन ओव्हरलोडेड असेल तर, आपल्याला 20,000 रुपये एवढा जबरदस्त दंडही होऊ शकतो. याशिवाय असे केल्यास आपल्याला प्रति टन 2000 रुपयांचा अतिरिक्त दंडही द्यावा लागू शकतो.

असे पाहा चलान

- Advertisement -
  • https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा.
  • चेक चलान स्टेटस हा पर्याय निवडा.
  • यानंतर आपल्याला चलान क्रमांक, वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक असे पर्याय दिसतील.
  • यांपैकी वाहन नंबर हा पर्याय निवडा.
  • विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि ‘Get Detail’ वर क्लिक करा.
  • यानंतर चलानचे स्टेटस आपल्या सोमोर येईल.

चलान ऑनलाइन भरण्याची पद्धत

  • https://echallan.parivahan.gov.in/ वर जा.
  • चलानशी संबंधित आवश्यक माहिती भरा.
  • गेट डिटेल्सवर क्लिक करा.
  • एक नवीन पान ओपन होईल. त्यावर चालानसंदर्भात माहिती असेल.
  • आपल्याला जे चलान भरायचे आहे ते चलान शोधा.
  • चालानासोबतच आपल्याला ऑनलाइन पेमेंटचा पर्यायही दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • पेमेंट संबंधित माहिती भरा.
  • यानंतर, पेमेंट कन्फर्म करा.
  • यानंतर आपले ऑनलाईन चलान भरले जाईल.

बीआयएस हेल्मेट घालणे आवश्यक

केंद्र सरकारने मागील दोन वर्षांपूर्वी केवळ दुचाकी वाहनांसाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) प्रमाणित हेल्मेटचे उत्पादन आणि विक्री करणे बंधनकारक केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षा समितीने मार्च 2018 मध्ये देशात हलक्या हेल्मेटची शिफारस केली होती.

लहान मुलांसाठीही नवा नियम

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलीकडेच सुरक्षा नियम अद्ययावत केले आणि चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकीवर नेण्यासाठी नवीन नियम केले. नव्या नियमानुसार दुचाकीवरून जाताना मुलांनी हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय दुचाकीचा वेग ताशी 40 किमीपेक्षा जास्त असू शकत नाही. नवीन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ₹1,000 चा दंड आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाऊ शकते.


हेही वाचा – मोठी बातमी! NIA कोर्टाने यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -