Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सरकारी कार्यालयात ड्रेसकोडनंतर आता मोबाईल वापरासाठी नवे नियम, जाणून घ्या नियम

सरकारी कार्यालयात ड्रेसकोडनंतर आता मोबाईल वापरासाठी नवे नियम, जाणून घ्या नियम

मोबाईल वरती बोलताना संविधानिक भाषेचा वापर करावा.

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सरकारी कार्यालयात ड्रेस कोड कसा असावा यासंदर्भातील नवे नियम जाहीर केले होते. या निर्णयानंतर आता मोबाईल वापरासंदर्भातही नवे नियम जाहीर केले आहेत. राज्य सरकारने परिपत्रक काढून सरकारी कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा वापर कसा करावा यासाठी नियम तयार केले आहेत. अनेकदा सरकारी कार्यालयांमध्ये मोबाईल वापरासंदर्भात कोणताही शिष्टाचार पाळले जात नाही, कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत सरकारकडून संबंधीत परिपत्रक काढण्यात येत आहे.

सरकारी कार्यालयात मोबाईल वापरासंदर्भात असे आहेत नवे निमय –

- Advertisement -

१) सरकारी कार्यालयीन कामासाठी कार्यालयात असलेला दूरध्वनीचा (लँडलाईन) वापर करावा.

२) मोबाईलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा आणि आपल्या बाजूला इतरही उपस्थित आहे याचाही विचार करावा.

- Advertisement -

३) मोबाईल वरती बोलत असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावा.

४) मोबाईल वरती बोलताना संविधानिक भाषेचा वापर करावा.

५) अत्यावश्यक वैयक्तिक मोबाईल कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत.

६) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल सायलंट मोडवरती ठेवण्यात यावा.

७) कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावरती असाल तर मोबाईल बंद ठेवू नये.


 

- Advertisement -