घरताज्या घडामोडीVideo: मनसेच्या इशाऱ्या नंतर तेजसमध्ये दिसणार मराठमोळी गांधी टोपी

Video: मनसेच्या इशाऱ्या नंतर तेजसमध्ये दिसणार मराठमोळी गांधी टोपी

Subscribe

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद अशी धावणारी देशातील दुसरी खासगी ट्रेन ‘तेजस एक्सप्रेस’ आजपासून सुरू झाली आहे. मात्र, ही सेवा सुरू होताच मराठी-गुजराती वाद उफाळला होता. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात असलेल्या होस्टेस गुजराती संस्कृतीचा पेहराव आणि गाडीवर असलेल्या गुजराती पाटीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिला होता. मुंबई-अहमदाबाद खासगी तेजस चालवायची असेल तर गुजराती संस्कृतीबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती देखील जपली पाहिजे. अन्यथा आम्ही मुंबईत गाडी येऊ देणार नाही’, असा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. या सबंधी दैनिक आपलं महानगरने सर्वप्रथम बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर आयआरसीटीने यांची दखल घेत. तातडीने मुंबईहून आजच सायंकाळी सुटणाऱ्या तेजसमधील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर गांधी टोपी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

 

- Advertisement -

मनसे नेता मिलिंद पांचाळ यांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले की, प्रवाशांसाठी खासगी तेजस मुंबई ते अहमदाबाद १७ जानेवारीपासून सुरू झाली आहे. या ट्रेनच्या नावाच्या पाटीवर केवळ इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेलाच स्थान देण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर रेल होस्टेस’ची वेशभूषा गुजराती संस्कृतीमधील आहे. महाराष्ट्रीयन संस्कृतीचा विसर रेल्वेची खानपान सेवा सांभाळणार्‍या आयआरसीटीसीला पडला होता. मात्र आम्ही आयआरसीटीसीचे महाव्यस्थापक राहुल हिमालयन यांना संपर्क केला. त्यांना सांगितले की गुजराती संस्कृतीबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती देखील जपली गेली पाहिजे. अन्यथा आम्ही मुंबईत गाडी येऊ देणार नाही’, त्यांवर त्यांनी तातडीने मुंबईहून आजच सायंकाळी सुटणाऱ्या तेजसमधील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर गांधी टोपी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गाडीच्या नावात सुद्धा मराठी असणार आहे.

मराठमोळी गांधी टोपी

आयआरसीटीसीच्या पर्यटन विभागाच्या संचालिका रजनी हसिजा यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना सांगितले की, भारत विविधतेचा देश आहे. तीच विविधता पेहरावात दिसत आहे. अहमदाबादहून सुटताना तेजसला गुजरातमधील पाच स्थानकांवर थांबा घ्यावा लागतो. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेहरावात गुजराती संस्कृती दिसते. मात्र मुंबईहून सुटणाऱ्या तेजसमध्ये कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर मराठमोळ्या संस्कृतीमधील पांढऱ्या रंगासह पिवळ्या आणि निळ्या रंगातील टोपी घातलेली दिसेल.

- Advertisement -

या खासगी तेजस मध्ये खाद्य संस्कृती जपताना तेजसमध्ये सकाळी नाश्ता म्हणून जिलेबी, फापडा, ढोकळा देण्यात आला होता. तसेच मराठमोळ्या संस्कृतीमधील खाद्य पदार्थ मुंबईहून सुटताना प्रवाशांना चाखता येणार आहे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -