घरट्रेंडिंग'करोना' हेअर स्टाईलचा नवा ट्रेंड

‘करोना’ हेअर स्टाईलचा नवा ट्रेंड

Subscribe

सध्या सोशल मीडियावर करोना हेअर स्टाईल ट्रेंड सुरु झाला आहे.

सेलिब्रिटी, स्पोर्ट्स आयकॉन्सना एरव्ही फॉलो करण्याचा ट्रेंड सर्रासपणे एरव्ही पहायला मिळतो. पण करोनाचा कोणताही चेहरा मोहरा नसला तरीही करोना स्वतःच एक स्टाईल आयकॉन बनला आहे. करोनाच्या धसक्याने एकीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरीही यामध्ये इनोव्हेशन अनलिमिटेड अस म्हणत आता करोनाची हेअर स्टाईल ट्रेंडसेटर व्हायला सुरूवात झाली आहे. करोनाच्या प्रसारासारखीच ही हेअर स्टाईलही तितकीच व्हायरल होतेय.

एक नवीन हेअर स्टाईल आली चर्चेत

- Advertisement -

अनेकदा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये केस कापण्याचा ट्रेंड येतो. विशेष म्हणजे त्यातच एखादा बॉलिवूड चित्रपट आला की त्या चित्रपटातील हिरो साखरे केस कापण्याचा ट्रेंड सुरु होतो. यापूर्वी आपण पाहिले होते की, बॉलिवूड अभिनेता अमिर खानचा गजनी चित्रपट आल्यानंतर अनेकांनी त्याची गजनी हेअर स्टाईल फॉल केली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गंगनम स्टाईल या गाण्यातील हिरोच्या केसांप्रमाणे अनेकांनी केसरचना केली. मात्र, सध्या एक नवीन हेअर स्टाईल चर्चेत आली असून सोशल मीडियावर ही हेअर स्टाईल व्हायरल होताना दिसत आहे.

सध्या जगभरात करोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे या करोना व्हायरसच्या हेअर स्टाईलचा ट्रेंड दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर या हेअर स्टाईलचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -

काय आहे ही हेअर स्टाईल

करोना व्हायरसच्या हेअर स्टाईलमध्ये एका मुलाच्या डोक्यावरील समोरचे केस तसेच ठेऊन मागील बाजूस असलेले केस बारीक करण्यात आले आहेत. त्यावर ‘करोना विषाणू’ कोरण्यात आला असून त्याचे इतर जंतू देखील आजूबाजूला पसरलेले असल्याचे दाखवण्यात आले आहे, अशी ही हेअर स्टाईल सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

‘करोना’चा कोकणी मास्क

वुहानहून आलेला करोना व्हायरस आता राज्यात येऊन हातपाय पाय पसरु लागला आहे. त्यामुळे या करोना व्हायरसचा अधिक फैलाव होऊ नये, याकरता मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, सध्या बाजारात मास्क मिळत नसल्यामुळे लोकांची चांगलीच पंचायत झाली आहे. ही गंभीर बाब असली तरी लोकांनी त्यावर देखील उपाय म्हणून आता नारळाच्या करवंटीचा ‘कोकणी मास्क’ तयार केला आहे. हे करवंटीचे मास्क सध्या सोशल मीडियावर ‘कोकणी मास्क’ म्हणून चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, एकीकडे करोना व्हायरस गंभीर म्हणून पाहिला जात आहे. तर दुसरीकडे त्याच नाविण्यरुपी असा परिणाम दिसून येत आहे. यामुळे लोकांमधील भितीचे वातावरण थोड्याफार प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा – शाब्बास ! मुंबईकरांनी स्वतःलाच केले क्वॉरनटाइन


Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -