मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवासेनेची कार्यकारणी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीमध्ये शिंदे गटातील नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्या चेहऱ्यांना शिंदेंच्या युवासेनेच्या कार्यकारिणीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या गटातील मंत्री दादा भुसे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलांसह अन्य आमदारांच्या मुलांना कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या युवा सेनेची कार्यकारणी सदस्यांचे नावे
- उत्तर महाराष्ट्र :अविष्कार भुसे
- मराठवाडा : अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील
- कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे - पश्चिम महाराष्ट्र : किरण साली, सचिन बांगर
- कल्याण भिवंडी : दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
- ठाणे, नवी मुंबई व पालघर : नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे
- मुंबई : समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
- विदर्भ : ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील
हेही वाचा – एक नेता, एक झेंडा, एक मैदान…; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित