पुण्यात नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यांची आत्महत्या, पत्नी नंतर पतीनेही घेतला गळफास

पत्नीच्या आत्महत्येचा धक्का निखिल सहन न करु शकल्याने पती निखिलने गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या

Newly married doctor couple nikhil shendkar ankita shendkar commits suicide in Pune on Doctor's Day
पुण्यात नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यांची आत्महत्या, पत्नी नंतर पतीनेही घेतला गळफास

देशभरात आज डॉक्टर्स डे (Doctor’s Day) साजरा केला जात असताना पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात एका नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यांनी आत्महत्या केली. बुधवारी रात्री २६ वर्षीय डॉक्टर पत्नीने आत्महत्या करुन जिवन संपवले त्यानंतर आज सकाळी २८ वर्षीय डॉक्टर पतीने देखील गळफास लावून आत्महत्या केली.  पुण्याच्या वानवडी येथील आझादनगरमधील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे हादरले आहे. डॉ. अंकिता शेंडकर ( nikhil shendkar ) आणि डॉ. निखिल शेंडकर (ankita shendkar) अशी आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्यांची नावे आहेत. दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Newly married doctor couple nikhil shendkar ankita shendkar commits suicide in Pune on Doctor’s Day)

अंकिता आणि निखिल पुण्याच्या आझादनगर येथे राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी आपली प्रॅक्टिस करत होते. अंकिताचे क्लिनिक आझादनगर गल्ली नंबर २ येथे होते तर निखिलचे क्लिनिक तिथूनच काही अंतरावर होते. काल रात्री क्लिनिकहून घरी येत असताना दोघांमध्ये फोनवर बाचाबाची झाली. त्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास निखिल घर पोहचला तेव्हा पत्नी अंकिता हिने ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. बेडरुममध्ये पंख्याला लटकलेल्या अंकिताला त्वरित ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी अंकिताचा मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवून त्यानंतर अंकिताचा मृतदेह तिच्या भावाकडे सोपवण्यात आला. पत्नीच्या आत्महत्येचा धक्का निखिल सहन न करु शकल्याने पती निखिलने गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले.

डॉक्टर निखिलच्या आत्महत्येची खबर मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. निखिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. काही महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. मात्र काही दिवसांपासून दोघेही मानसिक त्रासात होते त्याचप्रमाणे दोघांमध्ये मतभेद सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. वानवडी पोलिसांकडून दोघांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने केले खून, खोल खड्ड्यातून बाहेर काढले पाच मृतदेह