घरमहाराष्ट्रराज्यावर दुहेरी संकट, कोरोनाच्या लाटेसोबतच उष्णतेची लाटही

राज्यावर दुहेरी संकट, कोरोनाच्या लाटेसोबतच उष्णतेची लाटही

Subscribe

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे तीव्र उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याचे संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा ४५ अंशावर पोहचणार आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान ब्रम्हपुरी येथे ४३.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दरम्यान राज्यातील अनेक भागताही तीव्र उन्हाळा जाणवत आहे.

छत्तीसगडच्या दक्षिण भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. यामुळे विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये शनिवारी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यात राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय तर दुसरीकडे तापमानाचा पारा देखील वाढतो आहे. यामुळे राज्यावर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. राजस्थान आणि गुजरात या भागातून अतिशय गरम वाऱ्याचे प्रवाह मध्य भारताकडे प्रवाहित होत आहेत. जवळजवळ 100 किलोमीटर रुंदीचा हा वाऱ्याचा प्रवाह जळगाव ते चंद्रपूर असा असणार आहे. यामुळे या पट्ट्यात येणाऱ्या भागात प्रचंड तापमान वाढ होणार आहे.

- Advertisement -

तापमान वाढीचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्यात बसत आहे. कारण चंद्रपूरात तीव्र उन्हाचे चटके जाणवत आहेत. ज्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होतेय. एकीकडे कोरोना संसर्ग झेलताना दुसरीकडे मात्र उष्माघाताचे संकट झेलावे लागणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपूरचे तापमान 38 अंशांच्या घरात होते. मात्र एकाच आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठत 44 अंशांचा टप्पा गाठला. त्यामुळे तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहे. अनेक नागरिक उन्हापासून रक्षण करण्यासाठी लिंबू सरबत, सावलीचा आसरा घेत आहे.


 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -