घरमहाराष्ट्रMumbai heavy rain : मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांचे...

Mumbai heavy rain : मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

Subscribe

मुंबईसह कोकणातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील कांदिवली, बोरिवलीत आज विजांच्या गडगडाटासह पावसाने तुफान सुरुवात केली. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, दापोली भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहेत. यातच पुढील चार दिवस मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे ९ ते १२ जूनदरम्यान मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, सर्व जिल्ह्यांचे प्रशासकीय यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून सज्ज, सतर्क राहून काम करत परस्परांशी समन्वय ठेवावा असे निर्देश दिले आहेत.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात

दरम्यान कोरोना रुग्णसेवेसह कोणत्याही स्वरुपाच्या रुग्णसेवेत अडथळे निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्याबरोबरच धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लो-लाईन परिसरातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षित स्थळी हलवावे अशाही सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात ठेवत ओएनजीसीसह इतर केंद्रीय संरक्षण संस्थांनाही अतिवृष्टीची माहिती देत सतर्क राहण्यास सांगावे असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिका सज्ज

मुंबईत पुढील चार दिवस अतिवृष्टी होणार असा इशारा दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहन यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सांगितले की, यंदा पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसविले आहेत. तसेच अतिवृष्टीतच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंत्यांना स्पॉटवर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हिंदमाता परिसरात दोन मोठे टँक केले असून यात ,साचलेले पाणी वळते करून साठविण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याातील पोलीस स्थानिक भागात अडचणी निर्माण झाल्यास मदतीला येतील. तसेच प्रत्येक वॉर्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून गरज लागल्यास लोकांना तिथे स्थलांतरित केले जाईल.


MMRDA च्यावतीने मुंबईत होणार 24-तास आपत्कालीन मान्सून कंट्रोल रूमची स्थापना


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -