संजय राऊतांचा दसराही कोठडीत! जामिनावरील पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला

sanjay raut reaction on shiv sena uddhav thackerays public rally in buldhana

गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा दसराही आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे. कारण न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी आता 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. संजय राऊत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारावर संजय राऊतांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी राऊतांच्या जामीनाला ईडीने कोर्टात विरोध केला. दरम्यान कोर्टाने ईडी आता 10 ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

गोरेगावमधील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांनी ईडीने 31 जुलै रोजी अटक केली. यानंतर राऊतांना कोर्टाने न्यायलयीन कोठडी सुनावली. दरम्यान राऊतांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आला आहे. ज्यानंतर राऊतांना आज पुन्हा PMLA न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर जोरदार सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकललेली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा यंदाचा दसरा हा न्यायालयीन कोठडीचत (Judicial Custody) जाणार आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांनी या अगोदर जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर राऊतांनी विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली. यावेळी न्यायलयाने राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश ईडीला दिले होते. मात्र त्या सुनावणीवरील कारवाई पूर्ण न होऊ शकल्याने न्यायालयाने 27 सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. गोरेगाव पत्राचाळ गैर व्यवहारप्रकरणात 1 कोटी 6 लाख रुपये प्रवीण राऊत यांच्यामार्फत संजय राऊतांना मिळाल्याचा ईडीचा आरोप आहे.


महाराष्ट्राची माफी मागा! चौकशीला सामोरे जा, अन्यथा… वेदांता प्रकरणी शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा