Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय - वडेट्टीवार

दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय – वडेट्टीवार

Related Story

- Advertisement -

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक अखेर राज्य शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केले. त्यानुसार बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होणार असून दहावीची परीक्षा २९ एप्रिलला सुरू होणार आहे. दरम्यान, हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले होते. पण अंतिम दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भातला निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान

पुढे वडेट्टीवार म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. जालना, बीड जिल्ह्यात अधिक नुकसान झाले आहेत. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. नुकसानाची व्याप्ती किती आहे? याबाबतची माहिती पुढच्या दोन-तीन दिवसात किंवा आठवड्याभरता उपलब्ध होईल.’

कडक नियम लागू करण्याची आवश्यकता

- Advertisement -

दरम्यान काल सर्वत्र राज्यामध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. पण काही ठिकाणी कोरोना नियम पायदळी तुडवल्याचे पाहायला मिळाले. अकोल्यातील अकोट तालुक्यामधील कुसाटा गावात विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शेकडो लोक उपस्थित होते. पण कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अमोल मिटकरी यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, ‘नियम मोडणारा व्यक्ती कोणत्या पक्षातला आहे, हे पाहिले जात नाही. पण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कडक नियम लागू करण्याची आवश्यकता आहे. त्यावर विचार सुरू आहे. याबाबत पुढच्या आठवड्यात चर्चा होईल आणि कुठली नियमावली कशी करावी यावर निर्णय घेण्यात येईल.’

१२ नियुक्त आमदारांवरुन वडेट्टीवारांची राज्यपालांवर टीका

अद्याप राजपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्त झाली नाही आहे. त्यामुळे सध्या यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. १२ जणांची नाव महाविकास आघाडी सरकारकडून राज्यापालांकडे पाठवण्यात आली आहेत. पण त्या १२ नावांवर राज्यापालांनी अजूनही सही केली नाही आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण होत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच ते म्हणाले की, ‘विदर्भ वैधानिक मंडळाचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. विदर्भाचा निधी पळवला जाणार नाही.’


- Advertisement -

हेही वाचा – तर ट्रकभर एसआयटी कराव्या लागतील – Adv.आशिष शेलार


 

- Advertisement -