घरताज्या घडामोडीपुणेकरांसाठी खुशखबर! पुढच्या आठवड्यात पीएमपीएमएल बसेस रस्त्यावर धावणार

पुणेकरांसाठी खुशखबर! पुढच्या आठवड्यात पीएमपीएमएल बसेस रस्त्यावर धावणार

Subscribe

पुणे आणि पिंपरी-चिंचवडीमधील पीएमपीएमएलची बस सेवा पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. पाच महिन्यांनंतर पीएमपीएलच्या बसेस रस्त्यावरती धावणार आहेत. यामुळे गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमपीएलचा २२ तारखेला म्हणजेच गणेश चतुर्थीला श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

पीएमपीएमएलने पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रशासनाने बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. यालाच अजित पवार यांनी मान्यता दिली. म्हणून गणेश चतुर्थीला पीएमपीएमएलच्या बस सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. ४०० ते ४५० बसेस पहिल्या टप्पात सुरू होणार आहेत. तसेच या बस सेवा कोरोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर सुरू होणार असल्याची माहिती आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात पीएमपीएमएल बस सेवा सुरू होणार आहे. कोरोनाच संकट लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मर्यादित प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच बस सेवा सुरू झाल्यानंतर दिवसातून दोन ते तीन वेळा बसचे निर्जंतुकीकरण केले जाईल. तसेच प्रवाशांना प्रवास करताना मास्क घालणे अनिवार्य असणार आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या काळात बस सेवा ठप्प झाल्यामुळे पीएमपीएमएलला मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन देण्यासह, दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर गेले आहे. दीड कोटींपर्यंत उत्पन्न पीएमपीएमएलला प्रतिदिन साधारण मिळत होते. पण आतापर्यंत २०० कोटींचा फटका पीएमपीएमएलला बसला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी आणि मंगळवारी चिंचवड मनपा आयुक्त आणि पीएमपीएमएल प्रशासनाची बैठक पार पडली.


हेही वाचा – राज्यात पुन्हा होऊ शकतो ‘लॉकडाऊन’, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -