घरमहाराष्ट्रपुढच्या वर्षी विठ्ठलाची शासकीय महापूजा अजित पवारांच्या हस्ते; राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचा दावा

पुढच्या वर्षी विठ्ठलाची शासकीय महापूजा अजित पवारांच्या हस्ते; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा दावा

Subscribe

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा झाली. विशेष म्हणजे आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मान मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मंत्री ठरले आहेत. त्यामुळे आजच्या विठ्ठल महापूजेची चांगलीच चर्चा रंगली. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी विठ्ठल पूजेबाबत एक मोठा दावा केला आहे. पुढच्या वर्षी विठ्ठलाची शासकीय महापूजा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते होईल, असे भाकीत मिटकरांनी केले आहे. शिर्डीत राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात ते बोलत होते. (Next year pandharpur Vitthal official Mahapuja by Ajit Pawar hands ncp mla amol mitkari claim)

अमोल मिटकरांनी यावेळी विठ्ठलाच्या महापुजेसंदर्भात मुख्यमंत्री पदावरही भाष्य केलं आहे. विठ्ठलाची पुढची शासकीय महापूजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील. इतकचं नाही तर या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल. आणि अजित पवारचं हे पुढील मुख्यमंत्री असतील आणि तेच शासकीय पुजा करतील, असा विश्वासही मिटकरांनी व्यक्त केला.

- Advertisement -

राज्यातील जनतेच्या मनात रोष आहे. आषाढी आणि कार्तिकीची पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. यामुळे पुढील शासकीय महापूजेचा मान महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच अजित पवारांसारखे नेतृत्व महाराष्ट्राला लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना असही मिटकरी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबीर दोन दिवस शिर्डीत होत आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते, आमदार आणि पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. दरम्यान अजित पवार यांनी आज सकाळी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत उपस्थित होत्या. दरम्यान साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी अजित पवारांचा सत्कार केला.


हेही वाचा : दिल्लीत महापालिका निवडणुका जाहीर, 4 डिसेंबरला मतदान, 7 डिसेंबरला निकाल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -