Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी धक्कादायक खुलासा : पोलीस मुख्यालयातच शिजला मनसुखच्या हत्येचा कट, NIA आरोपपत्रात उल्लेख

धक्कादायक खुलासा : पोलीस मुख्यालयातच शिजला मनसुखच्या हत्येचा कट, NIA आरोपपत्रात उल्लेख

अँटिलीया जवळ ठेवलेली कार प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच सचिन वाजे याने मनसुख हिरनला आरोपी बनण्यास सांगितले

Related Story

- Advertisement -

अँटिलीया स्फोटके प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका समोर आली आहे. ‘जैश उल हिंद’ या कथित अतिरेकी संघटनेचे पत्रक तयार करून ते टेलिग्राम पाठ्वण्यासाठी परमबीर सिंग यांनी एका सायबर तज्ञाला पाच लाख रुपये दिल्याचे या सायबर तज्ञाने एनआयएला दिलेल्या जबाबात म्हटले आहे, असे एनआयए ने दाखल केलेल्या आरोपपत्रात समोर आले आहे. दरम्यान मनसुख हिरण यांच्या हत्येचा कट देखील मुंबई पोलीस मुख्यालयातच शिजला असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या हत्येची जवाबदारी पूर्णपणे प्रदीप शर्मा याने घेतल्याचे देखील आरोपपत्रात म्हटले आहे.

अँटिलीया स्फोटके आणि मनसुख हिरण हत्याकांड प्रकरणी एनआयए ने सोमवारी विशेष सत्र न्यायालयात १० हजार पानाचे आरोप पत्र दाखल केले आहे. या दोन्ही प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १० आरोपीच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यामध्ये सुमारे हजार पानाचे साक्षीदाराचे जबाब आहे. या साक्षीदारामध्ये एका सायबर तज्ञाच्या जबाबात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं नाव समोर आले आहे. अँटिलीया जवळ स्फोटकानी भरलेली स्कॉर्पिओ मिळून आल्यानंतर हे कृत्य अतिरेकी संघटनेचे असल्याचे भासवण्यासाठी ‘जैश ए उल हिंद’ या कथित संघटनेचे पत्रक टेलिग्राम वरून आल्याचे वृत्त समोर आले होते.

- Advertisement -

मात्र हे पत्र बनवण्यासाठी एका सायबर तज्ञाची मदत घेण्यात आली होती, त्यासाठी या तज्ञाला पाच लाख रुपये देण्यात आले होते, हे पाच लाख रुपये दुसरे तिसरे कोणी दिले नसून खुद्द तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिले होते असे या सायबर तज्ञाने एनआयएला दिलेल्या जबाबात म्हटले होते. यापूर्वी या सर्व प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका कुठेही दिसून येत नव्हती मात्र या कटात परमबीर सिंग हे देखील सामील होते हे या आरोपपत्रावरून समोर आले आहे.

अँटिलीया जवळ ठेवलेली कार प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच सचिन वाजे याने मनसुख हिरनला आरोपी बनण्यास सांगितले होते. मात्र हिरनने यासाठी नकार देताच मनसुख हिरण याच्या हत्येचा कट मुंबई पोलीस मुख्यालयातच शिजला. या कटात सचिन वाजे, सुनील माने आणि प्रदीप शर्मा यांची पोलीस मुख्यालयात बैठक पार पडली होती. या हत्येची सर्व जवाबदारी प्रदीप शर्मा याने घेतली होती, या साठी शर्मा यांनी त्याचे खास माणसे संतोष शेलार, सतीश मोटेकर, आनंद जाधव आणि मनीष सोनी यांची निवड केली होती. याकामासाठी चौघाना वाजेकडून मोठी रक्कम देण्यात येणार आहे असे शर्मा यांनी सांगितले होते असे आरोपपत्रात म्हटले आहे.


- Advertisement -

हेही वाचा : अँटिलिया प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिहांनी सायबर एक्सपर्टला दिली पाच लाखांची लाच


 

- Advertisement -