Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र परमबीर सिंह अडचणीत येऊ नयेत म्हणून अनिल शुक्ला यांची बदली; ग्रामविकास मंत्री...

परमबीर सिंह अडचणीत येऊ नयेत म्हणून अनिल शुक्ला यांची बदली; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना संशय 

मुंबई एनआयएचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची सोमवारी रात्री तडकाफडकी मिझोरमला बदली करण्यात आली.

Related Story

- Advertisement -

मुकेश अंबानी यांच्या एनटालिया बंगल्याजवळील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात एनआयए करत असलेल्या तपासाला मुहूर्तस्वरूप मिळत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने मुख्य तपास अधिकारी असलेल्या अनिल शुक्ला यांची बदली करण्यात आल्याचा संशय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. मुंबई एनआयएचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची सोमवारी रात्री तडकाफडकी मिझोरमला बदली करण्यात आली. शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली अंबानी स्फोटक प्रकरणाची चौकशी मागील ४० दिवस सुरु होती. त्यामुळे त्यांच्या तडकाफडकी बदलीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वाझे, परमबीर यांनीच स्फोटके ठेवल्याचे तपासात पुढे येण्याची शक्यता होती असेही मुश्रीफ म्हणाले.

मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटके का आणि कोणी ठेवली, हा तपास करण्याची आवश्यकता होती. तसेच परमबीर सिंह यांनी पत्र लिहिले त्याचवेळी मी ते या कटात सहभागी असल्याचे म्हटले होते. ते माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत. परंतु, मला या प्रकरणात वेगळा वास येत असल्याचे हसन मुश्रीफ प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. अनिल शुक्ला यांनी परमबीर सिंह यांच्या चौकशीनंतर त्यांना मुख्य आरोपी करण्याची दाट शक्यता असून हे बहुधा केंद्र सरकारला मान्य नसावे, त्यामुळेच शुक्ला यांचा कार्यकाळ संपल्याचे कारण पुढे केले जात असल्याची शंकाही हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केली आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह, सचिन वाझे या प्रकरणात सहभागी असावेत. याबाबतचा तपास अजून का होत नाही? वाझेंची रवानगी कोठडीत झाली असतानाही चौकशी झालेली नाही. इतका मोठा तपास सुरु असताना अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली कशासाठी? असा सवाल उपस्थित करतानाच हसन मुश्रीफ या सर्व गोष्टींची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.

दरम्यान अनिल शुक्ला यांची पाच वर्षांसाठी एनआयएमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. शुक्ला यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर रिक्त होणारे महानिरीक्षकपद भरण्यासाठी उपमहानिरीक्षक ज्ञानेंद्रकुमार वर्मा यांना बढती देण्यात आली आहे. शुक्ला यांना त्यांच्या मूळ केडर मिझोरामला पाठवण्यात आले आहे.

अनिल शुक्ला यांचा कार्यकाळ संपुष्टात  

- Advertisement -

एनआयएचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची त्यांच्या मूळ केडर मिझोरामला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण, तसेच मनसुख हिरेन हत्या ही दोन्ही प्रकरणे एनआयएकडे तपासासाठी आल्यानंतर पोलीस महानिरीक्षक अनिल शुल्का यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपास करण्यात आला होता. अनिल शुक्ला हे महाराष्ट्र्र प्रतिनियुक्तीवर होते, त्यांना सहा वर्षे पूर्ण झाली होती. मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणापूर्वीच शुक्ला यांची बदली झाली होती, पण अंबानी प्रकरणात त्यांना मुदत वाढ देण्यात आली होती. अनिल शुक्ला यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेवर ज्ञानेंद्र कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेंद्र कुमार वर्मा हे २००१ चे आयपीएस अधिकारी असून यापूर्वी त्यांनाही सीबीआय चे पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) काम बघितले आहे.

- Advertisement -