घरताज्या घडामोडीपाकिस्तानात ट्रेनिंग घेतलेला सरफराज मेमन मुंबईत दाखल, NIAकडून हायअलर्ट जारी

पाकिस्तानात ट्रेनिंग घेतलेला सरफराज मेमन मुंबईत दाखल, NIAकडून हायअलर्ट जारी

Subscribe

चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानात ट्रेनिंग घेऊन आलेला सरफराज मेमन हा मुंबईत पोहोचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच मुंबईत NIAकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
NIA या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ईमेल आल्याची माहिती मिळाली आहे.

सरफराज हा मध्यप्रदेशच्या इंदोरचा असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असून त्याची ओळख पटावी, यासाठी त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि आधार कार्डची कॉपी एनआयएकडून पोलिसांना मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. तसेच या व्यक्तिचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्याचप्रमाणे सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

- Advertisement -

मागील काही दिवसांपूर्वीच एनआयएकडून खलिस्तान आणि लॉरेन्स बिश्नोई सिंडिकेटप्रकरणी कारवाई सुरू आहे. या कारवाईत ७६ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून मुंबईतल्या आग्रीपाडा भागातील एका घराचा समावेश आहे. या प्रकरणी एका ३५ वर्षीय संशयिताला समन्स देण्यात आलं असून त्याची NIAकडून चौकशी केली जात आहे.

NIAला 3 फेब्रुवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीकडून एक ईमेल मिळाला होता. ज्यामध्ये तालिबान सदस्य असल्याचा दावा करण्यात आला होता. मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी NIAने मुंबई पोलिसांसह तपास सुरू केला आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत केंद्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांना माहिती दिली असून महाराष्ट्रातील अनेक शहरांना अलर्ट करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कर्मचारी कपाती दरम्यान Quiet Hiringचा नवा ट्रेंड, गार्टनर कंपनीचा मोठा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -