PFI च्या 8 राज्यांतील 25 ठिकाणी पुन्हा छापेमारी; औरंगाबाद सोलापूरमधून काही संशयित ताब्यात

nia other agencies continue across the country pfi place in karnataka kerala maharashtra solapur aurangabad thane

नवी दिल्ली :  दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि महाराष्ट्रविरोधी पथकाने (Maharashtra ATS) मध्यरात्री 8 राज्यांतील 25 ठिकाणी पुन्हा छापेमारी केली आहे. तपास यंत्रणांनी छापेमारीची दुसरी फेरी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. तसेच अनेक पीएफआय सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूरमधूनही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front Of India- PFI) कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. तर ठाण्यातून 4 आणि कल्याण, भिवंडीतून प्रत्येकी एक- एक कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या देशभरातील कार्यलयांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी जवळपास 100 जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातही काल एनआयए आणि एटीएसकडून संयुक्त कारवाई केली. सोमवारी मध्यरात्रीपासून तपास यंत्रणा ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.

यात औरंगाबादमध्येही एटीएस आणि पोलिसांनी कारवाई करत पीएफआयच्या आणखी 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात घेतले. तर सोलापूर, ठाणे, कल्याण, भिवंडीतही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्थानिक तपास यंत्रणांसह पुन्हा छापेमारी सुरु केली आहे. यात आसाममधून 7, कर्नाटकमधून 10 जणांना अटक केली आहे. यात पीएफआय आणि एसडीपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. देशभरातील आठ राज्यांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. तर मंगळुरु पोलिसांनीही PFI आणि SDPI चे सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. याशिवाय कोलार जिल्ह्यातील पोलिसांनी पीएफआयच्या 6 सदस्यांना अटक करण्याच आल्याचीही माहिती मिळत आहे. आसाम, दिल्ली, युपी, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांत ही छापेमारी सातत्याने सुरु आहे.

पीएफआय संघटना देशविरोधी कारवायात असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी ठेवला आहे. या संघटनेच्या माध्यमातून 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा कट आखला असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले.


शिवसेनेचे धनुष्यबाण शिंदे की ठाकरे गटाकडे? आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी