घरक्राइमदेशातील सहा राज्यात एनआयएची छापेमारी; कोल्हापूर, नांदेडचाही समावेश

देशातील सहा राज्यात एनआयएची छापेमारी; कोल्हापूर, नांदेडचाही समावेश

Subscribe

महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एएनआय) छापेमारी केली आहे. ISIS मोड्युल प्रकरणी जवळपास १३ ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापेमारी केली आहे. ISIS मोड्युल प्रकरणी जवळपास १३ ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. (nia searches at 13 premises suspects 6 states including isis activities)

एनआयएने मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यात छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच, मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसने तर बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूरमध्ये छापे टाकण्यात आले आहेत.

- Advertisement -

याशिवाय उत्तर प्रदेशातील देवबंद आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर, नांदेड या ठिकाणी छापा टाकला आहे. सर्वाधिक गुजरातमध्ये चार ठिकाणांवर छापा टाकला असून यात भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबादमधील ठिकाणांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये रविवारी सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि यूपी एटीएसने देवबंदमध्ये छापा टाकून एका संशयित तरुणाला अटक केली. संशयित तरुण हा मदरशाचा विद्यार्थी असल्याचे सांगितले. तो आयएस मॉड्यूलच्या संपर्कात होता. बराच काळ एनआयएच्या रडारवर होता. एनआयएच्या पथकाने सकाळी त्याला मदरशातूनच ताब्यात घेतले. मात्र, स्थानिक पोलिसांनी अद्याप एनआयएच्या कारवाईला दुजोरा दिलेला नाही.

- Advertisement -

यूपी एटीएस आणि एनआयएने गोपनीय माहितीच्या आधारे या संशयित दहशतवाद्याला पकडले आहे. या दहशतवाद्याचा सीरियातील बॉम्बस्फोटांशीही संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या एटीएसने ते सोबत घेतले आहे.


हेही वाचा – …नाहीतर महाराष्ट्र मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल, मनसेची संजय राऊतांवर खोचक टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -