घरताज्या घडामोडीSudha Bharadwaj Released: सुधा भारद्वाज यांची ३ वर्षानंतर तुरुंगातून सुटका, NIA कोर्टाकडून...

Sudha Bharadwaj Released: सुधा भारद्वाज यांची ३ वर्षानंतर तुरुंगातून सुटका, NIA कोर्टाकडून अटींवर जामीन

Subscribe

भीमा कोरेगाव प्रकरणी वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर सुधा भारद्वाज यांना एनआयएच्या स्पेशल कोर्टाने दिलासा देत जामिन दिला आहे. कोर्टाने भारद्वाज यांना अटींच्या आधारावर जामिन दिला आहे. सुधा भारद्वाज या तीन वर्षानंतर भायखळा तुरुंगातून बाहेर पडल्या आहेत. कोर्टाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाता येणार नाही अशी अट कोर्टाने घातली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप सुधा भारद्वाज यांच्यावर करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांपासून सुधा भारद्वाज भायखळ्यातील तुरुंगात होत्या. हायकोर्टाने सुधा भारद्वाज यांना जामिन देण्याबाबत एनआयएच्या स्पेशल कोर्टाला अधिकार दिले होते. एनआयए कोर्टाने सुधा भारद्वाज यांना ५० हजाराच्या जातमुचलक्यावर जामिन दिला आहे. तसेच त्यांना आपला पासपोर्ट जमा करावा लागेल आणि माध्यमांसमोर प्रतिक्रिया न देण्याची अट घातली आहे. भारद्वाज यांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला सुधा भारद्वाज यांच्या अधिकारांचा प्रश्न पुढे करत त्यांना व्यक्त होण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. कोर्टाने सुधा भारद्वाज यांना मुंबईच्या बाहेर जाता येणार नाही असे सांगितले होते. मात्र भारद्वाज या वकिल आहेत त्यांना दिल्ली, छत्तीसगड, महाराष्ट्रात फिरण्याची मुभा देण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

सुधा भारद्वाज यांच्या जामिनाबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर एनआयएने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने एनआयएची याचिका फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने काही तांत्रिक कारणांमुळे एनआयएच्या स्पेशल कोर्टाला जामिन देण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. एनआयएच्या स्पेशल कोर्टाने १ डिसेंबरला जामिन मंजूर केला. यानंतर भारद्वाज यांना बुधवारी विशेष न्यायाधीश डीई कोठलिकर यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.

- Advertisement -

भीमा कोरेगाव प्रकरणात अटक असलेल्या १५ आरोपींमध्ये सुधा भारद्वाज या जामिन मिळवणाऱ्या दुसऱ्या आहेत. त्यांच्याआधा वरवरा राव यांना प्रकृतीच्या कारणामुळे बेलवर सोडण्यात आले आहे. तसेच १६ वे फादर स्टॅन स्वामी यांचा तळोजा कारागृहात मृत्यू झाला आहे.


हेही वाचा : हेलीकॉप्टर्सच्या अपघातात घातपाताची शंका पंतप्रधानांच्या मनातही असेलच, मोदींनी खुलासा करण्याचे संजय राऊतांचे आवाहन

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -