घरक्राइमटेरर फंडिंग प्रकरणी मोठा खुलासा; छोटा शकीलला भारतातून पाकिस्तानात पाठवले कोट्यवधी रुपये

टेरर फंडिंग प्रकरणी मोठा खुलासा; छोटा शकीलला भारतातून पाकिस्तानात पाठवले कोट्यवधी रुपये

Subscribe

अंडरवर्ल्ड टेरर फंडिंग प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था चौकशी करत आहेत. या प्रकरणी दररोज नवे खुलासे होत आहेत. अशात एक नवा खुलासा आता समोर आला आहे. 2017-2018 दरम्यान भारतातून छोटा शकीलला पाकिस्तानमध्ये 16-17 कोटी रुपये पाठवण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी आरिफ भाईजानला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असताना, आरोपी भाईजानने 2018 मध्ये अंधेरी आणि मुंबईतील काळाचौकी परिसरात एका बिल्डरच्या सुरू असलेल्या प्रोजेक्टला मदत करण्याच्या नावाखाली 16-17 कोटी रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.

नंतर हे पैसे हवालाद्वारे दुबईमार्गे पाकिस्तानमधील छोटा शकीलला पाठवण्यात आले होते. दाखल एफआयआरनुसार, अंडरवर्ल्ड अशाप्रकारे भारतात दहशत निर्माण करत लोकांकडून पैसे उकळते आणि ते पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरत आहे. यापूर्वी एनआयएच्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती. पाकिस्तान विमानतळ आणि तेथील लोक अंडरवर्ल्डच्या कंट्रोलमध्ये असल्याचे उघड झाले होते.

- Advertisement -

छोटा शकीलच्या नातेवाईकाला अटक

एनआयएने तपासात उघड केले होते की, जर अंडरवर्ल्डने ठरवलं तर, पाकिस्तानात कोण येतंय, पाकिस्तानातून कोण जातंय याची माहिती जगात कोणालाच मिळणार नाही. यापूर्वी टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएने अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याला अटक केली होती. त्यानंतर एनआयएने सलीम फ्रूटच्या पत्नीचा जबाब नोंदवून घेतला. ज्यात त्याच्या पत्नीने मोठा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, ती अनेकवेळा पाकिस्तानात गेली होती आणि तिथून ती तिच्या पासपोर्टवर शिक्का न मारता पाकिस्तानात एन्ट्री करायची आणि बाहेर पडायची. ती छोटा शकीलच्या घरी एका कार्यक्रमासाठी गेली होती.


नवाब मलिकांनंतर त्यांच्या मुलाच्या अडचणीत वाढ; बनावट व्हिसाप्रकरणी गुन्हा दाखल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -