Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र मनसुख हिरेनच्या कारचोरीचा तपास एनआयएकडे

मनसुख हिरेनच्या कारचोरीचा तपास एनआयएकडे

पाचही आरोपींविरुद्ध एनआयएकडे भक्कम पुरावे, सर्व न्यायालयीन कोठडीत

Related Story

- Advertisement -

ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या स्कॉर्पिओ कार चोरीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला आहे. याच चोरीच्या स्कॉर्पिओ कारमधून स्फोटके ठेवून नंतर ती कार प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ पार्क करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटके ठेवलेली एक कार पोलिसांनी जप्त केली होती, ही कार चोरीची होती आणि कारचा मालक मनसुख हिरेन यांनी कार चोरीची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात केली होती, याच दरम्यान मनसुख हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना सापडला होता, स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्येचा तपास सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आहे, याच दोन्ही गुन्ह्यांत आतापर्यंत एनआयएने पाचजणांना अटक केली आहे. त्यात सीआययूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, रियाजउद्दीन काझी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल माने, निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गौर यांचा समावेश आहे. अटकेनंतर सचिन वाझे, रियाजउद्दीन काझी आणि सुनिल माने यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली, अलीकडेच विनायक शिंदे यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे.

- Advertisement -

या पाचही आरोपींविरुद्ध एनआयएकडे भक्कम पुरावे असून सध्या ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. आता एनआयएने हिरेन यांच्या कार चोरीचा तपास स्वतःकडे घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कार चोरीपासून झाली होती आणि शेवट हिरेन यांच्या हत्येत झाला होता. त्यामुळे स्कॉर्पिओ कार चोरीच्या गुन्ह्यांचा तपास आता एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. हिरेन यांच्या हत्येनंतर फॉन्सिक विभागाने एक अहवाल अलीकडेच सादर केला होता, त्यात त्यांच्यावर विषप्रयोग झाला नव्हता असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या शरीरात विष असल्याचे काही अंश सापडले नाही. लवकरच या गुन्ह्यांत पाचही आरोपीविरुद्ध आरोपपत्र सादर केले जाणार आहे.

- Advertisement -