Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Night Curfew : गणेशोत्सव काळात नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय...

Night Curfew : गणेशोत्सव काळात नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार

गणपतीचे आगमन हे साध्या पद्धतीने झाले पाहिजे या वेळी कोणतेही ढोल, रॅली काढण्यात येऊ नये

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सव काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकारे राज्यात रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लावण्याबाबत एक ते दोन दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव अवघ्या ४ दिवसांवर आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अधिक खबरदारी घेत आहे. गणेशोत्सव काळात गर्दी होऊ नये यासाठी कोरोना निर्बंध कठोर करण्यात येऊ शकतात. तसेच राज्य कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री रात्रीच्या संचारबंदीबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळे गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करुन देणार असल्याचे सर्व गणेश मंडळांनी ठरवलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली होती. मात्र या बैठकीत राज्यात गणेशोत्सवादरम्यान नाईट कर्फ्यू लावण्याबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. मात्र मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लावण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांतील गणपतीचे दर्शन सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाईद्वारे देण्यात येणार आहे.

गणपतीचे आगमन साध्या पद्धतीने

- Advertisement -

गणपतीचे आगमन हे साध्या पद्धतीने झाले पाहिजे या वेळी कोणतेही ढोल, रॅली काढण्यात येऊ नये अशा पद्धतीच्या सुचना प्रशासनाकडून पोलीस दलाला देण्यात येणार आहेत. तसेच गणेश मुर्तींचे विसर्जन साध्या पद्धतीनेच स्थानिक पातळीवर करण्याबाबत मार्गदर्शक सुचना आज संध्याकाळपर्यंत जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. कृत्रिम तलाव तयार करुन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. मोठ्या गणपतींचे आणि दहा दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनावेळी कोणताही गाजावाजा न करता, ढोल, ताशे न वाजवता या गणपती मुर्तींचे देखील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासंदर्भात सूचना जारी करण्यात येणार आहेत.

लालबागमधील गणपतींचे ऑनलाईन दर्शन

लालबागमधील सर्व गणेश मंडळे, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस, सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत लालबागमधील सर्व गणपतींचे दर्शन हे ऑनलाईन पद्धतीने भाविकांना देण्यात येणार आहे. यामुळे गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना गणपतीच्या मुर्तीची उंची ४ फुटांची असणार आहे. तर घरगुती गणपती मुर्तीची उंची २ फुटांची असणार आहे. लालबागचा राजा, रंगारी बदक, चिंचपोकळीचा चिंतामणीचे दर्शन भाविकांना ऑनलाईनद्वारे देण्यात येणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : Ganeshotsav 2021: मुंबईकरांनो, लालबागमधील सार्वजनिक गणपती दर्शन यंदा फक्त ऑनलाईनच


 

- Advertisement -