घरमहाराष्ट्रनाईट कर्फ्यूमुळे हॉटेल व्यावसायिक नाराज; शरद पवारांची भेट घेणार

नाईट कर्फ्यूमुळे हॉटेल व्यावसायिक नाराज; शरद पवारांची भेट घेणार

Subscribe

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाच्या नव्या प्रजातीने खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याजत आला आहे. दरम्यान, विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सर्व महापालिका क्षेत्रात मंगळवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत हा कर्फ्यू लागू असणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक नाराज झाले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल्स बंद होते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यात आता पुन्हा एकदा ऐन ख्रिसमस आणि इअर एंडिंगच्या तोंडावर नाईट कर्फ्यू लावल्याने मोठे नुकसान होणार असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. जे काही कोरोना काळात नुकसान झाले होते, ते भरुन काढण्याची संधी या दोन आठवड्यात होती. मात्र, राज्य सरकारच्या या निर्मयामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची समस्या त्यांच्या समोर मांडणार आहेत.

- Advertisement -

राज्यात आजपासून ५ जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदी

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली. ५ जानेवारीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -