घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरसंभाजीनगर दंगलीनंतर पोलीस आयुक्त निखिल गुप्तांची बदली, त्यांच्या जागेवर येणार 'हे' अधिकारी

संभाजीनगर दंगलीनंतर पोलीस आयुक्त निखिल गुप्तांची बदली, त्यांच्या जागेवर येणार ‘हे’ अधिकारी

Subscribe

राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या गृहविभागाकडून करण्यात आल्या आहेत. तर काहींना पदोन्नती देत बदल्या करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे.

तब्बल ३१ महिने छत्रपती संभाजीनगरचा कार्यभार सांभाळल्यानंतर निखिल गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. रामनवमीच्या आधीच्या रात्री झालेल्या दंगलीनंतर सुमारे एक महिन्याने त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. त्यांच्या जागी पिंपरी-चिंचवडचे सहपोलिस आयुक्त मनोज लोहिया पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. याशिवाय, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचीही बदली झाली असून मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) ज्ञानेश्वर चव्हाण हे त्यांच्या जागी रुजू होणार आहेत.

- Advertisement -

सप्टेंबर २०२० मध्ये डॉ. निखिल गुप्ता हे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले होते. एका वर्षात त्यांना पदोन्नती मिळाली. ते अतिरिक्त महासंचालक (एडीजी) दर्जाचे अधिकारी होते. विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे पोलीस आयुक्त पद त्यांच्यासाठी उन्नत करण्यात आले होते.

गुप्ता यांनी कोरोनाचा कार्यकाळ हाताळला होता. मात्र, रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुऱ्यात दंगल उसळली. या दंगलीत पोलिसांची १४ वाहनं जमावानं पेटवली. तसेच दगडफेकीत २० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाले होते. त्यानंतर अखेरच्या महिन्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर थेट हप्तेखोरीचा आरोप केला होता. परंतु निखिल गुप्तांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवे पोलीस आयुक्त मनोज लोहिया हे पदभार स्वीकारणार आहेत. आगामी काळातील निवडणुका पाहता पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : …तर आमचा रिफायनरीला विरोध, दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -