घरमहाराष्ट्रपुणेNikhil Wagle : पुण्यात निखिल वागळेंची गाडी फोडली! निर्भय बनो कार्यक्रमाला भाजपाचा विरोध

Nikhil Wagle : पुण्यात निखिल वागळेंची गाडी फोडली! निर्भय बनो कार्यक्रमाला भाजपाचा विरोध

Subscribe

पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला आहे. ही घटना आज 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. पुण्यात आयोजित निर्भय बनो या कार्यक्रम भाजप कार्यकर्त्यांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान निखिल वागळे सध्या कार्यक्रमस्थळी पोहोचल्याची माहिती आहे. (Nikhil Wagle Nikhil Wagles car was broken in Pune BJPs opposition to Nirbhay Bano programme)

पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमाचे साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाआधी पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी पुणे भाजपच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच हा कार्यक्रम उधळून लाऊ असाही इशारा दिला होता. मात्र भाजपने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमास सुरक्षा पुरवू असं महाविकास आघाडीने म्हटले होते. याचपार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. दुसरीकडे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. निखिल वागळे यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन येत असताना भाजपकडून त्यांची गाडी फोडण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा : BJP On Congress : प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची झालेली लाचारी…; भाजपाचा पटोलेंवर थेट हल्ला

अशा घटना काळीमा फासण्याचं काम करतात- अजित पवार

निखिल वागळेंच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना देतो. असे प्रकार आपल्या भागामध्ये घडता कामा नये. मधल्या काळातही शाई टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाही, संस्कृती नाही. यशवंतराव चव्हाण यांनी जो महाराष्ट्र घडवला किंवा सुसंकृतपणा दिला, त्याला अशाप्रकारच्या घटना काळीमा फासण्याचं काम करत आहेत, हे होता कामा नये, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Nitish Sarkar: Floor Test आधीच नितीश कुमार सरकारसमोर मोठा पेच; कोण बसणार अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर?

कालच्या गोळीबाराच्या घटनेवर लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचा हल्ला करण्यात आला आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी डीसीएम अजित पवार यांना विचारला. यावर ते म्हणाले की, असं कोण कशाला करेन. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पण असे हल्ले करण्याचं कोणाच्या मनात येईन. निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या, पॉझिटिव्ह राहुया. आपल्या देशाचे पंतप्रधान रात्रं-दिवस काम करत आहेत. देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळेला आपणही सकारात्मक विचार करावा, अशी माझी विनंती आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुण्यात निखिल वागळेंवर गुन्हा दाखल

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. वागळे यांनी जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून लालकृष्ण आडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही अवमान केल्याचे देवधर यांनी तक्रारीत म्हटलं आहे. वागळे यांनी सोशल मीडियावर ‘एका दंगेखोराने दुसर्‍या दंगेखोराला दिलेला पुरस्कार’ अशा स्वरूपाचे लिखाण केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -