घरमहाराष्ट्रपुणेNikhil Wagle : निखिल वागळेंच्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण

Nikhil Wagle : निखिल वागळेंच्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Subscribe

पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात 'निर्भय बनो' या कार्यक्रमाचे शुक्रवारी (9 फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जात असताना निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्याच दिवशी रात्री उशिरा जामीन मिळाला. पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचे शुक्रवारी (9 फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जात असताना निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पण पोलिसांनी निखिल वागळेंना दिलेल्या सूचना डावलून त्यांनी मार्गात बदलून सभास्थळी पोहोचले. यामुळे निखिल वागळेंच्या गाडीवरील हल्ला रोखणे पोलिसांना शक्य झाले नाही, असे स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी रविवारी (12 फेब्रुवारी) देण्यात आले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण निखिल वागळे यांनी पोस्ट केले होते. यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये निखिल वागळे यांच्याबद्दल रोष होता. यात पुण्यात निखिल वागळेंची ‘निर्भय बनो’ सभास्थळी जाऊन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ती उधळून लावण्याचा इशारा दिला होता. निखिल वागळे हे सभास्थळी जात असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला होता. पोलिसांनी निखिल वागळेंना या हल्ल्याची पूर्ण कल्पना दिली होती. पण सिनेमातील पोलिसांप्रमाणे पुणे पोलीस उशिरा पोहचल्याचा आरोप निखिल वागळेंनी केल्यानंतर पुणे पोलिसांनी याबाबतचे पत्रक काढून स्पष्टीकरण दिले.

- Advertisement -

हेही वाचा – Sushilkumar Shinde On Ashok Chavan: काँग्रेस नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही – सुशीलकुमार शिंदे

पुणे पोलिसांनी काय म्हटले?

निखिल वागळे यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने पुण्यातील वातावरण तापले होते. यानंतर निखिल वागळे हे पुण्यात पोहोचल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत पोलीस अधिकरी त्यांना सभास्थळी आंदोलक गर्दी करतील आणि या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून, गर्दी कमी होत नाही, तोपर्यंत सभा ठिकाणी जाऊ नका, असे सांगतले होते. पण निखिल वागळेंनी सभास्थळी जाण्याचा आग्रह धरला होता. निखिल वागळेंना पोलिसांनी दिलेला सल्ला धुडकावून लावत ते सभास्थळी जाण्यासाठी निघाले. तेव्हा निखिल वागळेंसोबत साध्या वेशातील पोलीस देखील होते.

- Advertisement -

सभास्थळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या आंदोलक होते. या आंदोलकांनी निखिल वागळेंची गाडीवर हल्ला केला होता. या प्रकरणी मालमत्तेचे नुकसान आणि दंगल केल्याचे गुन्ह्याची नोंद आंदोलकांवर करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलकांना पोलीस अटकेची कारवाई करण्यात सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -