Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मोठी बातमी! अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

मोठी बातमी! अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Subscribe

अनिक्षा हिच्यावर अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग आणि लाच दिल्याचा आरोप असून अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून तिला १६ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ‘ब्लॅकमेल’ करणारा बुकी अनिल जयसिंघानी आणि त्यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानीसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला जमीन मंजूर झालाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली होती.

अनिक्षा हिच्यावर अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग आणि लाच दिल्याचा आरोप असून अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून तिला १६ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात जयसिंगानीला मुंबई सत्र न्यायालयाने ५० हजारांचा जामीन मंजूर केला आहे. गेल्या सुनावणीत अनिक्षाला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी सुनावल्यानंतर लगेच जयसिंघानी यांनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता.

- Advertisement -

हे ही वाचा : पाकिस्तानात मोफतच्या गव्हाच्या पीठासाठी चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू तर ८ जखमी

अमृता फडणवीस यांनी केलेल्या आरोपानुसार, अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची ऑफर दिली होती आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेलही केलं होतं. या प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी याला २० मार्च रोजी गुजरातमध्ये अटक करण्यात आली. वडील अनिल जयसिंघांनी आणि मुलगी अनिक्षा दोघांनी मिळून अमृता फडणवीसांना फसवण्यासाठी पुरेपूर प्लॅन केला होता. कोणताही मेसेज पाठवण्याआधी ते एकमेकांशी चर्चा करत होते.

- Advertisement -

हे ही वाचा : कर्नाटकमध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटला, माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक

कोण आहे अनिक्षा जयसिंघानी?
अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिल जयसिंघानी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अनिक्षाने दावा केला की, ती कपडे, दागिने आणि शूज डिझाइन करते. अनिक्षाने उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिच्या डिझाईन केलेल्या अॅक्सेसरीज घालण्याची, तिच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी आणि विक्रीत मदत करण्याची विनंती केली होती.

- Advertisment -