Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रNIlesh Lanke : निलेश लंके यांचा 'भावी खासदार' उल्लेख, रोहित पवारांचे ट्वीट...

NIlesh Lanke : निलेश लंके यांचा ‘भावी खासदार’ उल्लेख, रोहित पवारांचे ट्वीट चर्चेत

Subscribe

मुंबई : पारनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांनी आज, शुक्रवारी अहमदनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (एनसीपी – एसपी) प्रवेश करत असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर एनसीपी – एसपीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत निलेश लंके यांचा ‘भावी खासदार’ असा उल्लेख केला आहे.

हेही वाचा – NIlesh Lanke : अजित पवारांना मोठा धक्का; आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके शरद पवार पक्षात

- Advertisement -

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाला राम राम करत पुन्हा राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षात घरवापसी करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच 15 दिवसांपूर्वीच निलेश लंके यांनी त्यांच्या “मी अनुभवलेला कोविड” या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते केले होते. यावेळी त्यांनी आज माझा कोणताही पक्षप्रवेश नाही, असे स्पष्ट करताना मी शरद पवारांच्या विचारधारेचाच असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, निलेश लंके पक्ष सोडणार नाहीत, असा दावा केला होता. निलेश लंके यांना पक्षात मी घेतले. त्यांना विकास कामाकरिता मोठ्या प्रमाणावर मदत केली. पण काही लोकांनी त्यांच्या डोक्यात ‘तू खासदार होशील’, अशी हवा घातली. पण वास्तविक तसे नाही. निलेश लंके पारनेरपुरते काम करू शकतात. पण बाकीच्या मतदारसंघामध्ये त्यांना वाटते तसे काम करता येणार नाही. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्ना केला आहे, असे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा – OBC Bahujan Party : जरांगेंच्या आंदोलनामुळे आधी पक्षाची स्थापना; आता लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर

पण आज, शुक्रवारी निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत, एनसीपी-एसपीमधील प्रवेशाचा मानस स्पष्ट केला. आपल्याला लोकसभेला सामोरे जायचं असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, असे ते म्हणाले. हाच धागा पकडत आमदार रोहित पवार यांनी ‘भावी खासदार’ असा त्यांचा उल्लेख करत, यह तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, असे म्हटले आहे.

उशीरा का होईना शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावानांच्या प्रवाहात सामील झाल्याबद्दल निलेश लंके यांचे मनापासून अभिनंदन. लोकसभेच्या मंगलकार्यात आपण हाती घेतलेल्या तुतारीला स्वाभिमानी जनता साथ दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Baramati : हर्षवर्धन पाटलांचा विरोध मावळला, विधानसभेतील मदतीबाबत फडणवीसांकडून शब्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -