घरताज्या घडामोडीदोनदा 10वीत नापास झालेल्या राऊतांचा कायद्याशी संबंध काय?, निलेश राणेंची खोचक टीका

दोनदा 10वीत नापास झालेल्या राऊतांचा कायद्याशी संबंध काय?, निलेश राणेंची खोचक टीका

Subscribe

भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यात हल्ला झाला. त्यावर मी खासदार अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांची प्रतिक्रिया ऐकली. जे विनायक राऊत दोनदा दहावीत नापास झालेत. ते कायद्यावर काय बोलणार?, जर ते कायदा शिकवू लागले तर महाराष्ट्र संकटात येईल, अशी खोचक टीका निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर केली आहे.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी किती जणांना त्रास दिला आहे. ठाकरेंनी पोलीस स्टेशनमध्ये कॉल करून गुन्हे दाखल करायला लावलेत. त्यामुळे ३०७ की ३०२ या विषयात तुम्ही पडू नका. एकतर्फी कारवाई करायला, हे काय ठाकरे सरकार नाही, असं निलेश राणे म्हणाले.

शिवसेनेतील बंडानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांच्या निष्ठा यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभर दौर करत असताना त्यांनी सिंधुदुर्ग दौराही केला आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद अनेकदा पहायला मिळाला आहे. आदित्य ठाकरेंना दोन चॅनेलने सोडलं तर कुणीही विचारत नाही. इव्हेंट कंपनीला गर्दी जमवायचं टार्गेट दिलंय. जर चॅनेलवाल्यांनी संपूर्ण आणि खरी वस्तुस्थिती दाखवली तर मातोश्रीचा वॉचमन पण नोकरी सोडेल, अशी टीका राणेंनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईतील वाडिया रुग्णालयात भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -