घरताज्या घडामोडीमहिलेवर अरेरावी करणाऱ्या भास्कर जाधवांनी कोणाच्या संस्कृतीबद्दल बोलू नये, निलेश राणेंचे प्रत्युत्तर

महिलेवर अरेरावी करणाऱ्या भास्कर जाधवांनी कोणाच्या संस्कृतीबद्दल बोलू नये, निलेश राणेंचे प्रत्युत्तर

Subscribe

चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकाच दिवशी केला होता. यामुळे नारायण राणेंच्या दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेताना मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले होते यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याला भाजप नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राणेंच्या मुलांसारखे मुलं कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नयेत असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे. यावर राणेपुत्र चांगलेच भडकले आहेत.

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला दाखवून देऊ असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. “स्वतःच्या गावाच्या मंदिरात गावकऱ्यांना शिवा घालणारा, मदत मागायला आलेल्या महिलेला मारायला जाणारा, स्वतःचा एकही रुपया चिपळूण शहराच्या विकासासाठी न वापरणारा भास्कर जाधव याने कोणाच्या संस्कृती बद्दल बोलू नये. भास्कर जाधव ने एक वस्थू दाखवावी जे त्याने कोकणाला स्वखर्चातून दिली” असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

निलेश राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,”भास्कर जाधव तुझी औकात 2024 ला तुला दाखवून देऊ, आता जेवढं उडायचय तेवढं उडून घे. वाळू चोर भास्कर जाधव तुझ्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाही. कुत्र्यासारखं भुंकत बसणं आणि समाजाला काही न देता नुसतं रडत बसणं हे तुझं राजकारण लवकरच संपणार” असे ट्विट करत भास्कर जाधव यांना खुलं आव्हानच निलेश राणे यांनी दिलं आहे.

- Advertisement -

भास्कर जाधव काय म्हणाले

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणेंच्या मुलांवर भाष्य केलं आहे. राणेंवर टीका करताना भास्कर जाधव यांनी विधान केलं की, नारायण राणे यांना सल्ला देऊन काही फायदा होणार नाही कारण म्हणजे त्यांच्या मुलांबाबत काय सांगावे, महाराष्ट्रात अशी मुलं कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नयेत, असे प्रत्येक आईबापाला वाटेल. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. अशा राज्यात आपण कोणाबाबत आणि कोणाच्या विरोधात कोणती भाषा वापरतो याचे जराही भान राखले जात नाही असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे. भास्कर जाधवांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -