मंत्रिमंडळाचा निर्णय नवाब मलिक जेलमध्ये बसून घेतात, निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

PMLA court allows Nawab Malik to get treated at a private hospital
नवाब मलिकांना न्यायालयाचा दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी टेरर फंडिंग केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या तसेच दाऊदशी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार केल्या प्रकरणी नवाब मलिकांना ईडीने अटक केली आहे. मलिक न्यायालयीन कोठडीत असतना ते मंत्री असलेल्या अल्पसंख्याक विभागाचे निर्णय घेत आहेत. असा घणाघात भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. काय शोकांतिका आहे. हे बघून हसावं की रडावं कळत नाही असे निलेश राणे म्हणाले.

भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये अल्पसंख्यांक विभागातही निर्णय़ घेण्यात आले आहेत. याची माहिती सरकारकडून ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. यामध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विभागाचा निर्णय सादर केला असून त्यात नवाब मलिकांचा देखील फोटो आहे. या निर्णयाच्या फोटोवरुन निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता” असा निर्णय असून त्या खाली नवाब मलिकांचे नाव आणि अल्पसंख्याक मंत्री असे म्हटलं आहे. तसेच त्यांचा फोटासुद्धा लावण्यात आला आहे. तर वरच्या भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो लावण्यात आला आहे.

फोटो पाहून हसावं की रडावं? – निलेश राणे

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयाचा फोटो भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये निलेश राणे म्हणाले की, काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तका सोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहे तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय.

नवाब मलिकांना अटक

नवाब मलिक यांच्या घरावर फेब्रुवारी २०२२ मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटेच्या वेळी छापेमारी केली यानंतर त्यांना सकाळी ७.४५ वाजता ईडीने ताब्यात घेतलं. तब्बल ८ तासांची चौकशी केल्यानंतर नवाब मलिकांना अटक करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करीत पुढील सुनावणी ६ मेपर्यंत तहकूब केली आहे.


हेही वाचा : राजस्थानचे CM बदला अन्यथा पंजाबसारखी अवस्था…, सचिन पायलट यांची आक्रमक भूमिका अन् नेतृत्वाला इशारा