घरताज्या घडामोडीवापरलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता, निलेश साबळेचा माफीनामा !

वापरलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता, निलेश साबळेचा माफीनामा !

Subscribe

चला हवा येऊद्या शो च्या माध्यमातून कुठल्याही महापुरूषांचा किंवा महान पुरूषांचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नव्हता. तो पूर्वीही नव्हता, पुढे कधीच नसेल. पण त्यामुळे जो वाद निर्माण झाला किंवा गैरसमज निर्माण झाला, म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. छत्रपती शाहू महाराज असतील तसेच देशातील महान आणि थोर व्यक्तीमत्व असतील, यांच्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे. वापरण्यात आलेला फोटो हा शाहू महाराजांचा नव्हता, ज्या राजांचा होता त्यांच्याबद्दलही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्याच महापुरूषांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. अगदी तांत्रिक गोष्टीतून झालेली ती चूक होती. त्यामुळे आम्ही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, आणि आपली माफी मागतो. क्षमस्व. अशा शब्दात माफी मागत निलेश साबळे यांनी चला हवा येऊद्या या शो मध्ये निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला आहे.

 

- Advertisement -

झी मराठी वरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्या या शो मधील एका व्हिडीओमध्ये महापुऱूषांचा अपमान झाल्याचा दावा करत या शोवर टिकेची छोड उडाली आहे. ११ मार्च रोजी प्रसारित झालेल्या एका प्रयोगात छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या फोटोचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला, असा आरोप खासदार संभाजी राजे यांनी केला. याबाबत अभिनेता डॉक्टर निलेश साबळे यांनी या संबंधी स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ प्रसारित केला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्वी आहोत असं म्हणतं माफी मागितली आहे. ११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या एपिसोड मध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या फोटोचा चुकीचा वापर केल्याचा आरोप खासदार संभाजी राजे केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -