Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE महाबळेश्वरच्या गुहेत सापडलेल्या दोन वटवाघूळात निपाह विषाणू, NIV ची माहिती

महाबळेश्वरच्या गुहेत सापडलेल्या दोन वटवाघूळात निपाह विषाणू, NIV ची माहिती

निपाहची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ६५ टक्क्याहून अधिक मृत्यूदर

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना व्हायरसने (Covid-19)  थैमान घातलेले असताना आता देशात नवीन सकंट येऊ पाहते आहे. खरंतर २०१८मध्ये केरळ राज्याने या विषाणूचा सामना केला होता. त्यावेळी केरळमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू झाले होते. तो जिवघेणा विषाणू म्हणजे निपाह (Nipah)आता महाराष्ट्रात देखिल दोन वटवाघळांमध्ये विपाह विषाणू आढळून आल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या विळख्यातून महाराष्ट्र बाहेर येत असताना आता महाराष्ट्राला निपाह विषाणूचा धोका निर्माण होण्याचा धोका संभवताना दिसत आहे. २०२० मध्ये महाबळेश्वरच्या एका गुहेत दोन प्रजातींची वटवाघूळ सापडले होते. या दोन प्रजातींच्या वटवाघूळांमध्ये निपाह विषाणू आढळल्याचे समोर आले असल्याची माहिती NIV (National Institute of Virology) ने दिली आहे. (Nipah virus in two bats found in Mahabaleshwar cave – NIV)

निपाह हा विषाणू कोरोना व्हायरसपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. केरळ राज्यात २०१८ साली निपाह विषाणूमुळे झालेले मृत्यूतांडव पाहिले तर हा विषाणू किती धोकादायक आहे याचा अंदाज येईल.
निपाह विषाणू हा कोरोना व्हायरसपेक्षा भयावह असल्याचे म्हटले आहे. कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये १ ते २ टक्के लोकांचा मृत्यू होतो. कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे. मात्र निपाहची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ६५ टक्क्याहून अधिक मृत्यूदर असल्याचे काही देशातून समोर आले आहे. कोरोनापेक्षा अधिक मृत्यूदर हा निपाह व्हायरसचा आहे.

- Advertisement -

नॅशनल इन्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी (NIV) दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरच्या गुहेत दोन प्रजाती असलेली वटवाघूळे आढळली होती. त्याच्यात निपाह विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या विषाणूवर कोणत्याही प्रकारचे औषध किंवा कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. त्यामुळे या विषाणूचा प्रसार झाल्यास मोठ्या संख्येने मृत्यू होण्याची शक्यता आहे. याआधीही भारतात केरळ त्याचप्रमाणे २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये निपाह विषाणू आढळून आला होता. त्याचप्रमाणे २०१८-१९मध्ये आसाम राज्यात देखिल निपाहचे रुग्ण आढळून आले होते. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थिती निपाह सारख्या भयावह रोगाचे विषाणू सापडणे ही देशासाठी आणि प्रामुख्याने महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे.


हेही वाचा – चिंता वाढली! भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटवर कोरोना लस कमी असरदार – WHO

- Advertisement -

 

- Advertisement -