फाशीच्या आधी मुलाला पुरी भाजी, कचोरी चारायची आहे

मला तिहार जेल प्रशासनाने मुलासाठी अन्न देण्यासाठीची परवानगी दिलेली नाही. पण मला विनयला भेटायची इच्छा आहे

vinay kumar mother
विनय कुमारच्या आईने व्यक्त केली आहे इच्छा

माझ्या मुलाला फाशी देण्यासाठीची जी पहाट होईल, अंघोळ केलेला माझा मुलगा कोठडीतून बाहेर पडेल, त्याच्या तोंडावर काळा कपडा टाकून फासावर लटकवण्यात येईल या सगळ्या आधी मला माझी एक इच्छा पुर्ण करायची आहे. ती म्हणजे मला हाताने माझ्या मुलाला पुरी भाजी भरवायची. एका बलात्काऱ्याची आई म्हणून जरी माझ्या वाट्याला उर्वरीत आयुष्यातल जगण येणार असल तरीही मला माझ्या मुलासाठीची ही इच्छा पुर्ण करू द्या अशी मागणी विनय शर्माच्या आईने केली आहे.

विनय शर्मा हा निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींपैकी एक आहे. २० मार्चला सकाळी ५.३० वाजता या चौघांनाही फाशी देण्यात येणार आहे. तब्बल ७ वर्षे ३ महिने कारागृहात काढल्यानंतर अखेर त्यांना फाशीची शिक्षा होणार आहे. १६ डिसेंबर २०१२ मध्ये एका तरूणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार केल्या प्रकरणी त्यांना पटियाला कोर्टामार्फत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मला माझे स्वतःचे नाव सांगायचे नाही, मला विनयची आई म्हणूनच माझी ओळख ठेवायची आहे असेही विनयच्या आईने म्हंटले आहे. क्या लिखोंगे तुम, कुछ होता है तुम्हारे लिखनेसे अशा शब्दात तिन्हे माध्यम प्रतिनिधींना आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिहार जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मला काहीही आणू नको अस सांगितल आहे. पण त्यांनी मला परवानगी दिली तर मी माझ्या मुलाला पुरी, भाजी आणि कचोरी खायलाा घालेन. मला माझ्या मुलाला भेटण्यासाठीची ही एक शेवटची संधी असेल.