कोकणात अमित ठाकरे – नितेश राणे भेट, राजकीय चर्चांना उधाण

कणकवलीत गेले असताना त्यांनी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांची भेट घेतल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही भेट राजकीय होती का, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असेल याविषयी तर्क लढवले जात आहेत.

amit thackeray and nitesh rane

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात झपाट्याने उलथापालथी होत आहेत. त्यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (MNS Leader Amit Thackeray) हे पक्षबांधणीसाठी कोकण दौऱ्यावर गेले आहेत. कणकवलीत गेले असताना त्यांनी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांची भेट घेतल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही भेट राजकीय होती का, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असेल याविषयी तर्क लढवले जात आहेत. (Nitesh rane and Amit thackeray meet in konkan)

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

अमित ठाकरे यांनी काल बुधवारी नितेश राणे यांच्या घरी ३० मिनिटे चर्चा केली. त्यांच्या भेटीचा फोटो नितेश राणे यांनी ट्विट करत आम्ही भगवाधारी असं कॅप्शनही दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उचलून धरला आहे, त्यापार्श्वभूमीवर नितेश राणेंनी दिलेली कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, या भेटीनंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी त्यांच्यात अनौपचारिक भेट झाल्याचं सांगितलं. ही भेट कौटुंबिक होती. आमच्यात राजकीय चर्चा झाल्या नाहीत, असंही राणेंनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – दगा कोणी दिला हे पाहायचे असेल तर भाच्यापासून सुरुवात करा, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

नितेश राणे म्हणाले की, “राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आमचे राजकारणाच्या पलिकडे संबंध आहेत. बाळासाहेबांचे सगळे गुण जसे राज ठाकरेंनी घेतलेत तसे राज ठाकरेंचे सर्व गुण अमित ठाकरेंनी घेतलेत, अगदी आवाजासकट.”

अमित ठाकरे तालुकानिहाय फिरत आहेत. लोकांना भेटत आहेत. जनसंपर्क वाढत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आमचं त्यांच्याशी कौटुंबिक नातं असल्याने आणि ते कणकवलीतच आल्याने आम्ही त्यांना घरी येण्याचं निमंत्रण दिलं, असंही पुढे राणेंनी स्पष्ट केलं. ही भेट केवळ शुभेच्छा देण्यासाठी होती. आम्ही लहानपणी एकत्र खेळलेलो आहे. वर्षानुवर्षांचे संबंध आहेत. त्यामुळे केवळ कौटुंबिक आणि मित्र म्हणून आमच्यात चर्चा झाली,” असंही नितेश राणेंनी सांगितलं.