घरताज्या घडामोडीगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या १८०० नागरिकांसाठी "मोदी एक्सप्रेस" धावणार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या १८०० नागरिकांसाठी “मोदी एक्सप्रेस” धावणार

Subscribe

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनचे बुकिंग २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत फोनद्वारे करण्याचे आवाहन

गणेश चतुर्थीसाठी दरवर्षी बसेस सोडण्यात येतात. पण या वर्षी देशाचे पंतप्रधान मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून खास ट्रेन सोडण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी “मोदी एक्सप्रेस” दादर स्टेशनवरुन धावणार असल्याची माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. या ट्रेनने विनामुल्य प्रवास करता येणार असून प्रवाशांना एकवेळचे जेवणही देण्यात येणार असल्याचे भाजप नेते नितेश राणे यांनी सांगितले आहे. एकूण १८०० नागरिक या ट्रेनचा लाभ घेऊ शकणार आहेत.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबई आणि राज्यातील कोकणी माणूस आपल्या गावी जात असतो. कोरोनाच्या संकटात ट्रेन बंद असल्यामुळे आणि वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे चाकरमान्यांना अडचणी येत आहेत. मात्र भाजप नेते नितेश राणे यांनी मोफत मोदी एक्सप्रेसची घोषणा केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार माणण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्सप्रेस सोडत आहोत. यामध्ये १८०० नागरिकांची सोय करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कोकणात जाणारी मोदी एक्सप्रेस दादर येथून सोडण्यात येणार असून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. दादरमध्ये प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. तसेच या प्रवासात नागरिकांना एकावेळचे जेवण दिले जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.

- Advertisement -

बुकिंग कसे कराल

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनचे बुकिंग २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत फोनद्वारे करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. देवगडमधील संतोष किंजवडेकर आणि अमोल तेली, वैभववाडीसाठी नासिरभाई काजी आणि कणकवलीसाठी मिलिंद मिस्त्री व संतोष कानडे यांना फोन करुन जागा आरक्षित करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -