घरमहाराष्ट्रनितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Subscribe

नारायण राणे तातडीने सिंधुदुर्गात रवाना

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचे प्रचार प्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कणकवली पोलिसांच्या कारवाईला वेग आल्यानंतर नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अगोदर नितेश राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते. तर दुसर्‍या बाजूला नितेश राणे हे सोमवारी अधिवेशनात गैरहजर होते. त्यांचा फोनही नॉटरिचेबल येत होता. नितेश राणे यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नागपुरातील आपला पूर्वनियोजित कार्यक्रम अर्धवट सोडून मुंबईत आले. येथून ते रात्री सिंधुदुर्गाकडे रवाना झाले. दरम्यान, येत्या ३० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक असून ३१ तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणात कणकवली पोलिसांच्या कारवाईला वेग आल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला आहे. त्याअगोदर नितेश राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. संतोष परब हल्ला प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर हल्ल्याचे मुख्य सुत्रधार असा नितेश राणे यांच्यावर आरोप आहे. दुसरीकडे नितेश राणे यांच्या अटकेसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत नितेश राणे यांना कोणत्याही परिस्थितीत अटक करा, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

दुसरीकडे विधान सभेतही शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी अतिशय आक्रमक होत नितेश राणे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या सगळ्या घटनेनंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. आज विधिमंडळात अधिवेशनाला नितेश राणे यांनी दांडी मारली. आज त्यांनी अधिवेशन कामकाजात सहभाग घेतला नाही. त्यांचा फोनही नॉटरिचेबल होता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांची फडणवीसांशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

आज होणार सुनावणी
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचे प्रचार प्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर सोमवारी २७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, मंगळवारी २८ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील अ‍ॅड. रावराणे यांनी दिली आहे.

- Advertisement -

कणकवलीत तणाव
आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. सध्या कणकवलीत तणावाचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्त कमालीचा वाढविण्यात आला आहे. नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस काल रात्रीपासून जंगजंग पछाडत आहेत. दरम्यान राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी दाभाडे सोमवारी सकाळी कणकवलीत दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -