घरताज्या घडामोडीमनसुखचे मुख्य आरोपी वाझेंचा बॉस कलानगरला बसलाय, नितेश राणे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मनसुखचे मुख्य आरोपी वाझेंचा बॉस कलानगरला बसलाय, नितेश राणे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Subscribe

शिवभोजनाची भाषा करु नये, मैदानात यावं संजय राऊत दोन पायांवर जाणार नाहीत

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात शिवसेनेचा वारंवार संबंध येत आहे. यावरुन भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांना अटक केल्यावर त्यांचा संबंध वाझे आणि हिरेन हत्या प्रकरणात कसा जोडला जातोय? मनसुखचा मुख्य आरोपी आणि वाझेंचा बॉस कलानगरला बसला असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मनसुख हिरेन आणि वाझे प्रकरणात घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माला अटक करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. शर्मा यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती यामुळे शिवसेनेचा संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतील वाझेंचा बॉस कलानगरमध्ये बसला असल्याचे म्हटलं आहे. अनिल परब सचिन वाझेचा बॉस आहे. अटक झालेल्या किंवा चौकशीतील सर्व नेत्यांचा मनसुख प्रकरणात कसा काय संबंध जोडला जात आहे. हिरेन आणि वाझे प्रकरणात शिवसेना मुख्य लिंक आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप यांनी २०१९ साली विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढली होती.

- Advertisement -

सचिन वाझे प्रकरणात शिवसेनेवरील संशय बळावत आहे. या प्रकरणाची चौकशी एनआयएने थेट कलानगरमधून केली पाहिजे. अनिल परब हे वाझेंचे बॉस असून तेच मनसूख हिरेनचे मुख्य आरोपी आहेत. अधिवेशनात अनिल परब यांनी सचिन वाझेची बाजू घेतली होती. मुख्यमंत्र्यांनीही वाझे म्हणजे लादेन आहे का असे म्हणत वाझेची बाजू घेतली होती असा भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी एनआयए करत आहे परंतु अधिवेशनात आम्हाला काय करायचे आहे ते करु असा इशाराही भाजपन नेते नितेश राणे यांनी दिला आहे.

संजय राऊतांना आव्हान

राम मंदिर जमीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन भाजपने शिवसेना भवन समोर मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. यावर संजय राऊत यांनी सामनातून म्हटलं आहे की, आता शिवप्रसाद दिलाय पुढे शिवभोजन थाळी देऊ आसा इशारा राऊत यांनी भाजपला दिला आहे. यावर शिवप्रसाद देणाऱ्यांनी कधी घराबाहेर यावं, शिवभोजनाची भाषा करु नये, मैदानात यावं संजय राऊत दोन पायांवर जाणार नाहीत असं ठामपणे नितेश राणे यांनी सांगितले असून राऊतांना इशाराच दिला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -