घरताज्या घडामोडीNitesh rane : नितेश राणेंचा कोठडीतील मुक्काम वाढणार, मंगळवारी होणार जामीन अर्जावर...

Nitesh rane : नितेश राणेंचा कोठडीतील मुक्काम वाढणार, मंगळवारी होणार जामीन अर्जावर सुनावणी

Subscribe

नितेश राणेंचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी तात्काळ जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार होती परंतु कोर्टाचे कामकाज लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांच्या कोठडीतील मुक्काम वाढणार आहे. नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नितेश राणेंच्या जामीनासाठी वकील सतीश मानेशिंदे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. परंतु दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकराने सोमवारी 7 फेब्रुवारीला एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे न्यायालयाचे कामकाजही बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयातील सर्व खंडपीठांमधील कामकाजही बंद ठेवण्यात येणार आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात नितेश राणेंचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राणेंचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने फेटाळला होता. यानंतर नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले होते. नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने सुनावणी करता १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नितेश राणेंचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी तात्काळ जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार होती परंतु कोर्टाचे कामकाज लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसल्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार आहे. जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणीत नितेश राणेंना दिलासा मिळणार का त्यांची कोठडी कायम राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला नितेश राणे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला होता. तर यामध्ये नितेश राणेंचा सहभाग असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. यामुळे नितेश राणेंना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांना चौकशीदरम्यान कोणताही पुरावा आढळला नसल्याचे नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Nitesh Rane : नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायलयीन कोठडी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -