नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान; म्हणाले, “पोलीस संरक्षण बाजूला ठेवा…”

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राऊत यांना आव्हान केले आहे. पोलीस संरक्षण बाजूला ठेवा, मग तंगड्या तोडून हातात देतो की नाही बघ, अशी धमकी नितेश राणे यांनीही दिली आहे.

Nitesh Rane challenges Sanjay Raut; Said,

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर (Maharashtra political crisis) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून या प्रकरणातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवण्यात आले आहे. भाजपचे राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष असून ते सध्या लंडनच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे ते आल्यानंतर ते 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, “त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही. आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे एवढेच त्यांना सांगतो आहोत. नाहीतर महाराष्ट्र काय आहे ते आम्हाला दाखवायला लागेल,” असे ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. ही धमकी नाही असेही राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा – लुटीचं राज्य भाजपाकडे…; कर्नाटक पराभवावरून संजय राऊतांची टीका

पण त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राऊत यांना आव्हान केले आहे. पोलीस संरक्षण बाजूला ठेवा, मग तंगड्या तोडून हातात देतो की नाही बघ, अशी धमकी नितेश राणे यांनीही दिली आहे. (Nitesh Rane challenges Sanjay Raut; Said, “Put aside police protection…”) दररोज सकाळी संजय राऊत हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागत असतात. पण त्यांच्या पत्रकार परिषदेला प्रतित्युत्तर म्हणून नितेश राणे हे देखील हल्ली पत्रकार परिषद घेत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन ठाकरे गटाकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. पण जर का त्यांनी याबाबत चुकीचा निर्णय घेतला तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सु्प्रीम कोर्टात जाणार असल्याचे देखील ठाकरे गटाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. पण याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर निशाणा साधत नितेश राणे म्हणाले की, “काही दिवसांपासून संजय राऊत आमच्या राहुल नार्वेकर यांना धमक्या देत बसलेला आहे. एका बाजूला त्यांना अपेक्षा आहे की नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून न्याय द्यावा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यांना धमक्या देत फिरत आहात. भाजपच्या नेत्यांना तुम्ही धमक्या देत आहात. गेले ते दिवस की तुम्ही धमक्या द्याल.”

ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा सामनाच्या समोर सभा आयोजित केली होती. त्यावेळी संजय राऊत इतका घाबरला होता की त्याने स्वतःला चार तास सामनाच्या बाथरूममध्ये कोंडून घेतले होते. या घटनेची आठवण करून देत नितेश राणे म्हणाले की, राऊत यांनी त्यांची वळवळणारी जीभ जर जागेवर ठेवली नाही तर एक दिवस संरक्षण बाजूला करतो, किंवा राऊतने त्यांचे संरक्षण बाजूला करावे, या नियमबाह्य सरकारचे जे काही संरक्षण घेऊन फिरत आहे, ते बाजूला करावे, त्यावेळी जर का नाही लोकांनी तंगड्या तोडून हातात दिल्या नाही तर माझे नाव बदलून टाका, असे आव्हान नितेश राणे यांनी केले आहे. उगाच आमच्या भाजपच्या लोकांना धमक्या दिल्या तर आम्हीही गप्प बसणार नाही, असा सज्जड दम देखील नितेश राणे यांनी राऊतांना दिला आहे.