Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 10 जूनपूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार, नितेश राणे यांचा दावा

10 जूनपूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार, नितेश राणे यांचा दावा

Subscribe

मुंबई । ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे येत्या १० जूनपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्याच्या अटीवर त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याची तयारी केली आहे, असा खळबळजनक दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी रविवारी येथे केला.

संजय राऊत यांच्या गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात बैठका सुरू आहेत. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांची भूमिका काय होती, ते पहा. राऊत हे त्यावेळी सातत्याने अजित पवार यांच्याविरोधात बोलत होते. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अट घातली होती की, अजित पवार यांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षप्रवेश करतो. त्यामुळे संजय राऊत हे सातत्याने अजित पवार यांना लक्ष्य करत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे आपल्याला पुन्हा खासदार करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्यात रस नाही. त्यामुळे मला राष्ट्रवादीत घ्या, असा प्रस्ताव संजय राऊत यांनी मांडला होता, असेही नितेश राणे म्हणाले. संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडणे लावली. खरेतर उद्धव ठाकरे हे शरद पवारांना, राजीनामा मागे घ्या, हे सांगण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्यासोबत सिल्व्हर ओकवर जाणार होते, पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होऊ शकली नाही. यामागे नेमके काय षडयंत्र आहे. संजय राऊत ठाकरेंना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही राणे यांनी केला.

नितेश राणे नक्की भाजपचे आमदार आहेत का? कारण शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी, भाजप असे १० पक्ष फिरलेल्या माणसाने संजय राऊतांच्या निष्ठेच्याबाबतीत दावा करू नये. संजय राऊत बाळासाहेबांचे भक्त आहेत. उद्धव ठाकरेंवरील निष्ठा असलेले शिवसैनिक आहेत.
– सुनील राऊत, आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -