पार्थ पवार लंबी रेस का घोडा – नितेश राणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा आमदार नितेश राणे यांनी चांगलाचा समाचार घेतला आहे. नितेश राणे यांनी याबाबत ट्विट केले आहे.

mla nitesh rane
नितेश राणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा आमदार नितेश राणे यांनी चांगलाचा समाचार घेतला आहे. “पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणावर खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पहिले भाषण आणि मोठी गर्दी.. यासाठी धाडस लागते. पार्थ पवार लंबी रेस का घोडा है.. याद रखना,” असे ट्विट करत नितेश राणे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. नितेश यांनी पार्थ यांची पाठराखण केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


मावळमधून उमेदवारी

पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी १७ मार्चला पार्थ यांच्या प्रचारसभेचा नारळ फोडण्यात आला. यावेळी पहिल्यांदाच पार्थ पवारांनी जाहीर सभेत राजकीय भाषण केले. मात्र पहिल्यांदा भाषण करताना पार्थ पवार काहीसे भांबावल्यासारखे दिसले.