घरताज्या घडामोडीउदय सामंतांनी कोट्यावधी रुपयांची कंत्राटी कामे पदरात पाडून घेतली, नितेश राणे यांचा...

उदय सामंतांनी कोट्यावधी रुपयांची कंत्राटी कामे पदरात पाडून घेतली, नितेश राणे यांचा आरोप

Subscribe

मत्स्य व्यवसाय विभागामार्फत पर्ससीन, नेटधारक व एल. ई. डी. धारक यांचेकडून करोडो रूपयांची वसुली

महाविकास आघाडीमधील भ्रष्टाचारी नेत्यांवर भाजपकडून आरोप करण्यात आले आहेत. आतापर्यंत अनेक नेत्यांवर भाजपकडून आरोप करण्यात आले असून काहींवर कारवाई करण्यात येत आहे. तर आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत यांनी रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. सामंत बंधूंनी मे. आर. डी. सामंत कन्सट्रक्शन कंपनीच्या मार्फत दोन्ही जिल्हयामंधील करोडो रूपयांच्या कामांचे ठेके पदरात पाडून अधिकायांवर दबाव टाकून निकृष्ट दर्जाची कामे केली असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंनी याबाबत भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्र लिहून कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे.

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीत मंत्री उदय सामंत आणि त्यांचा भाऊ किरण सामंत हैदोस घालत आहेत. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार करणं, बोगस कंत्राटदार उभे करुन पैसे खाणे, मत्स्य खात्यामध्ये मच्छिमारांवर अन्याय होत आहे. वाईस चान्सलरच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. मेंटेनन्समध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. याबाबत मुद्दे किरीट सोमय्यांकडे मांडले आहेत. सोमय्यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. तसेच कोकणाचा विकास व्हावा यासाठी या भ्रष्टाचाराला वाचा फोडली असल्याचे नितेश राणे यांनी म्हटंल आहे.

- Advertisement -

नितेश राणेंचं पत्र 

आमदार नितेश राणे यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटलं आहे की, आपणाकडून तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये केलेल्या प्रचंड श्रष्टाचाराची प्रकरणे स॒द्या बाहेर काढली जात असून भविष्यात महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार मुक्त होण्याच्या दृष्टीने आपण उघडलेल्या मोहीमेमुळे महाराष्ट्रीय जनतेला निश्चितच अभिमान वाटत आहे. सध्या कोकणात विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री असलेले अनील परब व उदय सामंत यांनी सत्तेच्या माध्यमातून गैरमार्गने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यापैकी अनील परब यांची चौकशी आपल्या तक्रारीवरून सुरू आहे. त्याचप्रमाणे उदय सामंत व त्यांचे पडद्या मागून भ्रष्ट कारभार सांभाकणारे बंधू किरण सामंत यांनी दोन्ही जिल्हयांमधील शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरमार्गने पैसा जमा करून त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा सपाटा लावला आहे असे नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे.

पुढे नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, किरण सामंत यांची मे. आर. डी. सामंत कन्सट्रक्शन कंपनीच्या मार्फत दोन्ही जिल्हयामंधील करोडो रूपयांच्या कामांचे ठेके पदरात पाडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत. त्यामध्ये बोगस कंत्राटदार उभे करून त्यांचे मार्फत कामे केली जात आहेत. त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय विभागामार्फत पर्ससीन, नेटधारक व एल. ई. डी. धारक यांचेकडून करोडो रूपयांची वसुली दरमहा करण्यात येत असल्याबाबत मी मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लमजी शेख यांचेकडे तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे व्हाईस चैंन्सलर नियुक्त्यांमध्येही गैरमार्ग अवलंबल्याचे पुरावे आपणाकडे लवकरच सादर करीत आहोत. अशाप्रकारे मंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून गैरमार्गने पैसा जमा करून त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तरी भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे. याबाबतचे सर्व पुरावे लवकरच आपणास सादर करण्यात येतील असे नितेश राणे यांनी सोमय्या यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  सोमय्यांवरील कारवाईबाबत महाविकास आघाडीत बेबनाव


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -