राऊत सध्या मुस्लीम समाजाच्या प्रेमात, नितेश राणेंची टीका

Nitesh Rane

राज्यात त्र्यंबकेश्वरमधील वादावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत SIT नेमण्याचे आदेश दिले आहेत. परंतु एसआयटीची नेमणूक करण्यापेक्षा डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यालाच प्रतित्यूर म्हणून भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

राऊत सध्या मुस्लिम समाजाच्या प्रेमात

बारा ज्योतिर्लिंगमध्ये त्र्यंबक एक महत्त्वाचं स्थान आहे. परंतु त्याठिकाणी धूप करण्यासाठी जमण्यात आल्याचं मुस्लिम लीगचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलं. पण माझ्याकडे त्या मंदिराच्या ट्रस्टचं एक पत्र आहे. त्या ट्रस्टने या घटनेनंतर पोलीस निरीक्षकांना लिहिलं. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न वजा हट्ट केला, असं पत्रात म्हणण्यात आलं आहे. कोणाला तिथे धूप करायची असेल तर हट्ट का करावा?, चादर घालण्याचा हट्टाहास करून ते लोकं तिथे आले होते. हे कदाचित मुस्लिम लीगच्या प्रवक्त्याला समजलं नसेल. संजय राऊत हे मुस्लिम समाजाच्या प्रेमात पडले आहेत, असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात आज शुद्धीकरणाचा कार्यक्रम 

त्र्यंबकेश्वर मंदिरात आज शुद्धीकरणाचा कार्यक्रम होईलच. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी जाहीर केली असून चौकशीला सुरूवात करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. पण मंदिर परिसरात सुरू असलेली मटण-चिकनची दुकानंही बंद झाली पाहिजेत. एवढ्या पवित्र जागेवर मटण-चिकण का विकलं जातं? याचंही उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. तसेच लवकरात लवकर ही दुकानं बंद करावीत अशी मागणी मी त्याठिकाणी करतो.

राऊत काय म्हणाले?

त्र्यंबकेश्वर मंदिरात कोणीही घुसले नाही. या घटनेसंदर्भात माहिती देताना संजय राऊत यांनी सांगितले की, कोणीही मंदिरात घुसल्याची माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं. त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरमध्ये बंद, आंदोलन सुरू केलं आहे. मुस्लीम समाजाचे एक सुफी संत आहेत. त्यांचा उरूस निघतो, गेल्या 100 वर्षांपासून ही परंपरा असल्याची माहिती मिळाली आहे. त्या परंपरेनुसार ते मंदिराच्या गेटवर आपल्या देवांना धूप दाखवून पुढे जातात. त्यानुसार ते सगळं झाले होते. महाराष्ट्रात आणि देशात या परंपरा सर्वत्र आहेत.


 

हेही वाचा : त्र्यंबक प्रकरणाऐवजी कुरुलकर प्रकरणी SIT नेमा; संजय राऊतांचे सरकारला