‘बदला’च्या राजकारणाचा आज अंत – आमदार नितेश राणे

nitesh rane

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर आणि इतर आमदारांनी ऐकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बदलाच्या राजकारणाचा आज अंत, असं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नितेश राणेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्या घरावर हल्ले करणं, आमच्यावर खोट्या केसेस टाकणं आणि वेगवेगळ्या पद्धतीचा त्रास देणं, या सर्व गोष्टींचा निकाल आज लागला आहे. शेवटी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र कुठे गेला आणि महाराष्ट्राला कुठपर्यंत घेऊन गेले, यावर काहीही चर्चा होत नाहीये. पण महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये बदला घेण्याचा जो राजकारण करण्यात आलेला आहे. त्याचा अंत आजच्या राजकारणात झालेला आहे.

एक आमदार म्हणून मला अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे त्या अपेक्षा पूर्णही होतील. सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण म्हणून प्रचंड त्याच्यावर अन्याय केला गेला. सगळ्या बाबतीत पीछेहाट झाली आहे. निधी द्यायची नाही आणि वेगवेगळ्या लोकांच्या बदल्या करायच्या, अशा प्रकारची यादी फार मोठी आहे. परंतु हे सर्व जुने दिवस आहेत. परंतु आता माझा मतदारसंघ कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या मार्गाने जाईल आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हक्काने घेऊन जातील असा माझा विश्वास आहे.

ओबीसींच्या बाबतीत आणि इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले तेही शेवटच्या दिवशी घेतले, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, नितेश राणे म्हणाले की, खरंतर एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला पाहीजेत. जर त्यांनी ही भूमिका घेतली नसती. तर त्यांना या सर्व गोष्टी करायच्या पण आठवलं नसतं. गेल्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावसं का वाटलं नाही?, असा प्रश्न देखील राणेंनी मुख्यमंत्र्यांना विचारला.


हेही वाचा : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, आघाडी सरकार कोसळ


ले