Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मग 'शक्ती' कायदा काय चाटायचा आम्ही?

मग ‘शक्ती’ कायदा काय चाटायचा आम्ही?

'शक्ती' कायदा काय चाटायचा आम्ही?', अशी घाणाघाती टीका नितेश राणेंनी ट्विटरद्वारे राज्य सरकारवर केली आहे.

Related Story

- Advertisement -

पुण्यामध्ये पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली आणि एकच खळबळ उडाली. तिच्या या आत्महत्येने आता राजकीय वळण घेतले आहे. पूजाची आत्महत्या की हत्या याचे गूढ अद्याप काही समोर आलेले नाही. परंतु, पूजाच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करण्यात येत आहेत. विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चित्रा वाघ यांनी टीका केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ नितेश राणेंनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘जे दिशा बरोबर झाले तेज पूजा बरोबर होणार असेल तर तो ‘शक्ती’ कायदा काय चाटायचा आम्ही?’, अशी घाणाघाती टीका नितेश राणेंनी ट्विटरद्वारे राज्य सरकारवर केली आहे.

मृत्यू म्हणजे आत्महत्या की हत्या?

- Advertisement -

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उढाण आले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच तिचा मृत्यू म्हणजे आत्महत्याच आहे, असे नोंदविलेले नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सध्या तिच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यातील बऱ्याचशा क्लिप या बंजारा बोलीत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून सध्या भाषांतराचे काम देखील सुरु आहे.

कोण आहे पूजा चव्हाण?

ज्या तरुणीच्या आत्महत्येने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे ती पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाला ५ बहिणी आहेत. त्यापैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. पुण्यात ती भाऊ विलास चव्हाण आणि मित्र अरुण राठोड यांच्यासोबत भाड्याच्या घरामध्ये राहत होती. रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास आणि अरुण यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिचा मृत्यू झाला.


- Advertisement -

हेही वाचा – पूजा चव्हाणला ठाकरे सरकार न्याय देणार का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल


 

- Advertisement -